उद्धव ठाकरेंनी घेतले साईबाबांचे मनोभावे दर्शन दर्शना नंतर राहाता येथे सभेसाठी रवाना
उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. आज नगर जिल्ह्यातील सोनई,श्रीरामपूर, राहुरी सह राहाता या ठिकाणी आले होते. या सर्व ठिकाणी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच ठिकाणी त्यांची मोठी सभा झाली. त्यांचे भव्य स्वागत यावेळी करण्यात आले. सोनई येथे तब्बल २० जेसीबी मधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. दरम्यान या सभेमध्ये त्यांनी विरोधकांवर समाचार घेतला तसेच त्यांनी यावेळी आ.शंकराव गडाख यांचे तोंडभरून उद्धव ठाकरेंनी केले.
मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की सोन्यासारखे माझे मर्द मावळे आहेत, त्यांचे, त्यांच्या प्रामाणिकपणाचे मी काय वर्णन करू, ज्यांच्याकडे पक्ष नाही, चिन्ह देखील नाही तरीही तुम्ही आमच्यावर प्रेम करत आहात, हे पाहून मी नतमस्तक होतो.. आता सध्याला माझ्याकडे तुम्हाला द्यायला विश्वास आहे. गडाखांसारखे निष्ठावंत दुसरे नाहीत असे ते यावेळी म्हणाले.
मोदी आणि फडणवीस यांच्या क्लिप आहेत. आदर्शमधील डीलर असा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. मला नाही अब्रू मी कशाला घाबरू, अशी भाजपची परिस्थिती आहे, जे घाबरतात ते भाकड पक्षात जातात, अशी कडाडून टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सोनई येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
आज उद्धव ठाकरे यांची राहाता येथे सभा आहे त्यापूर्वी शिर्डीत येऊन साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले त्यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आले