खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होत आहे शेतकरी मेळावा
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होत आहे शेतकरी मेळावा
शिर्डी: शिर्डी लोकसभा मतदारसंघात शेती पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, बदलत्या हवामानाचा मुकाबला करत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काय उपाय योजना करता येईल ?यासाठी मतदारसंघामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्याची नियोजन बैठक शिर्डी येथे पार पडली. समाजातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, मान्यवर, प्रगतशील शेतकरी, कृषी तज्ञ, वैद्यकीय, शिक्षण, व्यापार, उद्योग, समाजकारण आदी क्षेत्रांतील नामवंतांना सन्मानित करुन त्यांच्याशी हितगुज साधले जाईल. मतदार संघाच्या विकासासाठी व शेती पाणी प्रश्न सोडविण्यासाठी साठी केसेस होणार असतील तर त्यासाठी सर्वात पुढे मी असेन. असा विश्वास नियोजन बैठकीत खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी व्यक्त केला.
शिर्डी मतदारसंघाचे सदाशिवराव लोखंडे हे खासदार नसते तर पन्नास वर्षांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना स्वप्नातही पाणी पहायला मिळाले नसते. खासदार लोखंडे यांच्या मुळेच निळवंड्याचे पाणी वंचित शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे. असे गौरवोद्गार खा. लोखंडे यांच्या बद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते पाटील यांनी काढले. याप्रसंगी उपस्थित खा सदाशिव लोखडे, किसान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सरपंच धनंजय जाधव , शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, बाजीराव दराडे , रामभाऊ रहाणे, बाळासाहेब पवार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे, विठ्ठल घोरपडे रमेश काळे, रावसाहेब थोरात, सुरेश डी के, संजय पवार, महेश देशमुख, सुनिल कराळे मनिल नरोडे, एकनाथ यादव, भगवान गगावणे, मिनाक्षी वाकचैारे, विजया धोंड,मिराताई, गुजाळ ,अक्षय जाधव, राजेंद्र शेळके , देवा लोखडे, मिनाकाका जोधळे , विक्रम जगदाळे , संपत जाधव,गणेश कानवडे, सोमनाथ कानकाटे, सदाशिव गोंदकर, अशिष गाडेकर, आदी शिवसैनिक मोठ्या संख्येंन उपस्थित होते.