शिर्डी येथील नगर मनमाड महामार्ग लगतच्या हॉटेल इंटरनॅशनल पुढील अनधिकृत बांधकाम पाडण्याची समीर वीर यांची मागणी!
शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी येथील नगर मनमाड महामार्गाच्या लगत असणाऱ्या हॉटेल इंटरनॅशनलचे पुढील अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी शिर्डी येथील अखिल भारतीय लहुजी सेनेचे राज्य कार्याध्यक्ष
समीर रामचंद्र वीर यांनी केले आहे.
शिर्डी नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात समीर वीर यांनी पुढे म्हटले आहे की,
शिर्डी नगरपरिषदेच्या हद्दीत असलेले हॉटेल इंटरनॅशनलचे मालक आहुजा यांनी नगरपरिषदेची कुठलीही परवानगी न घेता आपल्या हॉटेल समोर बेकायदेशीर एकाबाजूला रेस्टॉरंट व दुसऱ्या बाजूला आलिशान शोरूम बनवले होते.
त्याची आपण सन २०२० ला माहिती अधिकारात माहिती घेतली होती. तेव्हा मला नगरपरिषदेने माहिती दिली होती कि, ह्या इंटरनॅशनल हॉटेल समोरील रेस्टोरंट आणि शोरूम दुकानासाठी नगरपरिषदेची कुठलीही परवानगी नाही म्हणून मी सन २०२० ला नगर परिषदेला अर्ज केला होता कि, हे विनापरवाना अनधिकृत बनवलेली दुकाने पाडण्यात यावी .त्यावर नगर पालिकेने काहीच कारवाई न केल्याने मी नगरपरिषदेसमोर ५ दिवस आमरण उपोषण केले होते.मला नगर परिषदेने लेखी पत्र दिल्याने मी उपोषण सोडले होते .त्यानंतर शिर्डी नगरपरिषदेने सन २०२१ मध्ये पोलीस संरक्षण घेऊन ते शोरूम दुकान आणि रेस्टोरंट तोडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा त्या मालकाने त्याच ठिकाणी पुन्हा रेस्टोरंट बनवले आहे. तेव्हा हे हॉटेल इटरनॅशनल समोरील अनधिकृत बनवलेले हॉटेल रेस्टॉरंट त्वरित पाडण्यात यावे, अशी मागणी समीर रामचंद्र वीर शिर्डी यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद शिर्डी यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांनी
पोलीस आयुक्त सो. मुंबई,
महसूल आयुक्त सो नाशिक विभाग. नाशिक,
जिल्हाधिकारी सो अहमदनगर,
पोलीस अधीक्षक सो अहमदनगर,
उपजिल्हाधिकारी, शिर्डी विभाग शिर्डी ,प्रांताधिकारी शिर्डी विभाग शिर्डी ,तहसीलदार
राहता,यांना सुद्धा ही निवेदने पाठवली आहेत.