श्रीरामपूर – यात्रोत्सवात ठेकेदारांमार्फत लागणारे रहाट पाळणे,रामनवमी ट्रस्टला देण्यात यावे – जोएफ जमादार
श्रीरामपूर - यात्रोत्सवात ठेकेदारांमार्फत लागणारे रहाट पाळणे,रामनवमी ट्रस्टला देण्यात यावे - जोएफ जमादार
श्रीरामपुर प्रतिनिधी:
दर वर्षी सालाबादप्रमाणे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हजरत सय्यद शाह कादरी बाबा दर्गाह शरीफचा सर्वधर्मिय उत्सव व रामनवमी असे तीन मोठे सण हे दिनांक १४, १५, १६ व १७ एप्रिल २०२४ रोजी साजरे होणार आहेत. तसेच यात्रेनिमित्ताने यात्रेतील रहाट पाळणे, विविध प्रकारचे स्टॉल्स शहरातील मेनरोड व इतरत्र लागतील. मोठ्या आनंदाचे व भक्तीभावाचे वातावरण श्रीरामपूर शहरात निर्माण होईल.असा मोठा उत्सव या निमित्ताने दरवर्षी साजरा केला जातो .
मात्र यात्रेनिमित्ताने जे रहाट पाळणे लागतात, स्टॉल लागतात, विक्रेते आपली छोटी मोठी दुकाने मांडतात ते श्रीरामपूर नगर परिषदेचे आदेशाने होतात. परंतू श्रीरामपूर शहरात जे रहाट पाळणे लावले जातात, त्याचा ठेका जो कुणी घेतो तो फक्त त्याची आर्थिक कमाई कशी जास्त होईल याच विचाराने ठेका घेऊन त्याद्वारे आपली कमाई वाढवितो. परंतू श्रीरामपूर शहरातील सर्वसामान्य जनतेला, लहान मुलांना रहाट पाळणेत बसणेसाठी आकारली जाणारे तिकीट हे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला न परवडणारे असते. एखाद्या कुटूंबात जर ४-५ लहान मुले असतील तर साधारणतः ३०० ते ४०० रुपये खर्च करावे लागतात. जे या महागाईच्या काळात न परवडणारे ठरते. तसेच गेल्या वर्षीं दोनठिकाणी रहाटपाळणे व दोन ठेकेदार होते. त्यामुळे वाद-विवाद वाढले, नागरिकांची गैरसोय झाली, त्रास झाला. तसे यावर्षी घडू नये.
म्हणून आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीनी आपणांस नम्र विनंती आहे की, रहाट पाळणे चालविणेबाबत आपण रामनवमी उत्सवसमिती ट्रस्ट ला देण्यात यावे जेणे करुन रहाट पाळणेचे तिकीट हे कमीत कमी आकारले यावे असा निवेदन देण्यात आले यावेळी समाजवादी पार्टिचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार,आसिफ़ तांबोळी,अमजद शेख,रऊफ शेख, युनुस पठाण,आदि उपस्थित होते.