श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र आळंदी देवाची अशा पायी दिंडी सोहळ्याचे हभप संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 28 नोव्हेंबर पासून प्रस्थान !
शिर्डी (प्रतिनिधी) श्री रोकडेश्वर महाराज व सद्गुरु गंगागिरीजी महाराज, संत ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मार्गदर्शक प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर) व सह मार्गदर्शक अड.प्रमोद दादा मुरलीधर जगताप यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक 28 /11/ 2023 ते दहा डिसेंबर 2023 श्री क्षेत्र भऊर ते श्री क्षेत्र आळंदी देवाची अशी कार्तिक एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मार्गदर्शक ह भ प संजयजी महाराज जगताप( भऊरकर) तालुका वैजापूर यांनी दिली आहे.
प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्री क्षेत्र भऊर श्री क्षेत्र आळंदी देवाची पायी दिंडी सोहळ्याचे मंगळवार 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी नऊ वाजता श्री.रोकडेश्वर महाराज मंदिर भऊर तालुका वैजापूर येथून श्री पांडुरंग,श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे ,टाळ मृदंग पखवाद यांचे पूजन करून या पायी दिंडीचे प्रस्थान होणार आहे. रस्त्यात ठिकठिकाणी मुक्काम होणार आहे. पायी दिंडी सोहळ्यात मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ ,आरती, प्रवचन ,कीर्तन सेवा होणार आहे. ही पायी दिंडी आळंदीत पोहोचल्यानंतर शनिवारी 9 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ह भ प संजयजी महाराज जगताप यांचे कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे रविवार दिनांक दहा डिसेंबर 2023 रोजी ही सकाळी नऊ ते अकरा या वेळेत हभप संजयजी महाराज जगताप
भऊरकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद अन्नदाते ऍड प्रमोद (दादा) मुरलीधर जगताप ,भऊरकर तालुका वैजापूर यांच्याकडून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पायी दिंडी चा मुक्काम न्यू पेटकर धर्मशाळा, इंद्रायणी गार्डन, आळंदी देवाची येथे राहणार आहे. वारकऱ्यांनी पायी दिंडी सोहळ्यात आपला बिछाना सोबत घ्यावा तसेच मौल्यवान वस्तू सोबत घेऊ नये. असेही म्हटले आहे. या पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी बांधवांनी सहभागी व्हावे त्यासाठी संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर 98 50 24 12 88 तसेच 93 07 07 15 21// 80 10 08 91 38 //
91 30 11 87 65, //
94 23 45 40 40,//या मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आवाहान करण्यात आले आहे. या दिंडी सोहळ्यासाठी दिंडी चालक ह भ प आप्पासाहेब महाराज मुके, रथसेवा तुळशीराम जगताप, गाडी सेवा गुलाबराव शेळके, आचारी सेवा अशोकराव गायकवाड, विणेकरी ह भ प भाऊसाहेब महाराज जगताप, वीणा पूजन सोन्याबापु जगताप, भऊर तालुका वैजापूर येथील समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, वारकरी, दिंडी चालक ,सह दिंडी चालक यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्याचप्रमाणे या दिंडी सोहळ्यातील पायी वारकऱ्यांना विविध ठिकाणी दानशूर मंडळी कडून सकाळी चहा नाश्ता आणि दुपारचे व सायंकाळचे मुक्कामाच्या ठिकाणी जेवण, दुपारी चहा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती ह भ प संजयजी महाराज जगताप(भऊरकर )यांनी दिली आहे.