कत्तलीसाठी जाणाऱ्या ३२ वासरांना जीवदान
६ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त
शिर्डीप्रतिनिधी/ शिर्डी विभागाचे डी वाय एस पी संदीप मिटके यांनी गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीच्या विरोधात वेळोवेळी कारवाई केल्या असताना काही जण अजूनही व्यवसाय करत असल्याने असे विक्री करणारे पोलीसांच्या रडारवर असुन त्या अनुषंगाने गुप्त खबरीने दिलेल्या माहितीच्या. आधारे राहाता तालुक्यातील ममदापूर येथील अनिल उंडे यांच्या शेत जमिनीत एका वाहनातून कत्तली करीता गोवंश जातीचे जनावरे आणले आहेत हि माहिती मिळताच पथकातील पोलीसांनी सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असतं सदर शेतामध्ये एक पांढरे रंगाचे पिकप व त्यामध्ये गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने भरलेले ओरडताना मिळून आले व पिकप मधील व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव सुफियान मेहबूब कुरेशी राहणार ममदापूर तालुका राहता असे सांगितले त्याच्या ताब्यातील पिकप वाहनाची पाहणी करता त्यामध्ये गोवंश जातीचे ३२ जनावरे मिळून आले त्यांचे समोर चारा पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय न करता उपाशी ठेवून कत्तली करिता एकत्र पिकप वाहनांमध्ये जमा करून ठेवले म्हणून सदर इसमास व पिकप मधील गोवंश जातीचे जनावरासह असा एकूण ६लाख ३०हजार रुपये चा मुद्देमाल ताब्यात घेऊनच त्याचे विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं.६८५/२०२३महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ (सुधारित२०१५) चे कलम५ (अ).५(क).९(अ)९(ब) सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम१९६०चेकलम ११(च)(ज) पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे यांचे फिर्यादी वरून लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर डि वाय एस पी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील कर्मचारी अशोक शिंदे, , असीर सय्यद, राशिनकर दिनेश कांबळे मच्छिंद्र इंगळे थोरमिसे यांनी केली आहे जर कोठे असे प्रकार सुरू असतील तर त्या बाबतची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी केली आहे तसेच शिर्डी परिसरात काही दुचाकी चारचाकी वाहने घेऊन श्रीरामपूर कोपरगाव राहता तालुक्यातील काही तरुण विशिष्ट अशा उपनगरात जाऊन पार्सल पध्दतीने नियोजनबद्ध गोमांस पाकीट वितरण करुण रोख रक्कम घेऊन पसार होत असल्याने अशा पध्दतीने वितरण प्रणाली उध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी काही जागरूक नागरिका मधुन पुढे आली आहे