शिर्डी | देशभर उभारली जाणार साईबाबांची सेम-टू-सेम मंदिर..
साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी साई संस्थानकडून देशभर साई मंदिर उभारणीचे विचाराधीन आहे. याकरीता एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साई संस्थान शिर्डी सारखेच मंदिर उभारणार आहे.
शिर्डी: साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी साई संस्थानकडून देशभर साई मंदिर उभारणीचे विचाराधीन आहे. याकरीता एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साई संस्थान शिर्डी सारखेच मंदिर उभारणार आहे. याशिवाय तेथे रुग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणार्या साईबाबांच्या मंदिरांचे बांधकामासाठी पन्नास टक्के रक्कम अथवा 50 लाखापेक्षा जी रक्कम कमी आहे ती रक्कम मदत करण्याचा साई संस्थान विचार करत असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी दिली.
श्रीसाई मंदिर निर्माण धोरण – श्री साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी श्रीसाई संस्थानकडून देशभर श्रीसाई मंदिर उभारणीचे विचाराधीन आहे. याकरीता एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे श्रीसाई संस्थान शिर्डीसारखेच मंदिर उभारणार आहे. याशिवाय तेथे रुग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणाऱ्या श्री साईबाबांच्या मंदिरांचे बांधकामासाठी पन्नास टक्के रक्कम अथवा 50 लाखापेक्षा जी रक्कम कमी आहे ती रक्कम मदत करण्याचा श्रीसाई संस्थान विचार करत आहे.
डोनेशन धोरण – यापुढे भाविक ज्या प्रमाणात देणगी देतील, त्याप्रमाणात त्यांना वर्षभर ठराविक दिवशी आरती व दर्शनाची सुविधा संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी श्रीसाई संस्थान युनिक आयडी कार्ड बनवणार आहे. यापूर्वी श्रीसाई समाधीवर शाल पांघरण्यासाठी सोडत पद्धत अवलंबिण्यात येत होती. आता यातही मोठ्या देणगीदारांना ही संधी उपलब्ध करून देण्याबाबत श्रीसाई संस्थानने प्राथमिक प्रस्ताव तयार केलेला आहे.
श्रीसाई मंदिर असोसिएशन धोरण– जगभरातील व देशभरातील श्रीसाई मंदिरांची असोसिएशन स्थापन करण्याबाबतही श्रीसाई संस्थानचा विचार सुरू आहे.
उपरोक्त धोरणांबाबतची माहिती संस्थानचे www.sai.org.in या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. या तिन्ही धोरणांबाबत भाविक व ग्रामस्थांच्या सूचना ceo.ssst@sai.org.in या ई-मेलवर मागवण्यात येत आहेत.