शिर्डी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज सोमवार अखेरचा दिवस होता. बंडखोरांच्या मनधरणीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले गेले. शिर्डी विधानसभा मतदारसंघातही आज चार उमेदवारांनी माघार घेतली आहे.
त्यामुळे आता आठ जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, प्रभावती घोगरे, राजू सादिक शेख, मोहम्मद इसहाक इब्राहिम शहा, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, मयूर संजय मुर्तडक, रेश्मा अल्ताफ शेख, रामनाथ भाऊसाहेब सदाफळ, आता हे आठ जण शिर्डी मतदार संघात रिंगणामध्ये आहेत.
त्यामध्ये भाजपाचेच पण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचा उमेदवारी अर्ज राहिला आहे. त्यामुळे शिर्डीत आता सध्या हीच चर्चा सुरू आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे जेष्ठनेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी बंडखोरी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी पिपाडा यांना स्पेशल विमानाने बोलवून घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी कायम राहिली आहे. त्यामुळे आता मविआकडून प्रभावती घोगरे , महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील तर अपक्ष राजेंद्र पिपाडा यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
भाजपकडून राजेंद्र पिपाडा यांची बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीला मुंबईत चर्चेला आणण्यासाठी भाजपकडून शिर्डीत स्पेशल चार्टड फ्लाईट पाठवण्यात आले होते. मात्र भाजपचे प्रयत्न निष्फळ ठरले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राजेंद्र पिपाडा हे राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका करत होते. शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील बंडखोरी रोखण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले.
मात्र राजेंद्र पिपाडा हे अपक्ष निवडणूक लढण्यावर शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यामुळे आता शिर्डीत मविआकडून प्रभावती घोगरे, महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील तर अपक्ष राजेंद्र पिपाडा यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. आज अर्ज माघरीच्या शेवटच्या दिवशी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यात ममता भाभी पिपाडांचा समावेश आहे. आता शिर्डीत खऱ्या अर्थाने प्रचार सुरू झाला आहे.
राजकीय चर्चेलाही उधाण आले आहे. यावेळी दैनिक साई दर्शन शी बोलताना डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले की, शिर्डी मतदारसंघात ना.विखे यांची दडपणशाही संपवण्यासाठी मी माघारी घेतलेली नाही, कोण कोणाचे डिपॉझिट जप्त करतो हे या येत्या 23 तारखेला कळेलच असे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी म्हटले आहे.