शिर्डी प्रतिनिधी /साईबाबा संस्थानच्या शिर्डी येथील प्रसाद भोजणालयात शिर्डी येथे साई दर्शन घेतल्यानंतर प्रती दीन ६० ते ७० हजार भाविक भोजण प्रसाद घेऊन समाधानी होतात तर वर्षाकाठी दोन ते अडीच कोटी भाविक या भोजण प्रसाद घेऊन जातात
साईबाबा संस्थान सकाळी १० ते रात्री १० या वेळेत भोजण सुविधा देत असते
त्यात वरण भात पोळी शिरा दोन भाज्या यांचा समावेश असतो यासाठी किमान ५०० स्त्री पुरुष कर्मचारी यासाठी सेवा देतात त्याबरोबरच भक्ती निवास, द्वारा वती, साई आश्रम, साईनाथ व साईबाबा सुपर हाॅस्पिटल या ठिकाणी देखील भोजण साईभक्त भाविकांना व रुग्णालयातील रुग्णाना मोफत भोजण दिले जाते
त्याबरोबरच सेवाभावी शिर्डी येथील मूकबधिर शाळा अनाथ आश्रम कनकुरी येथील वयोवृद्ध आश्रम व निमगाव येथील शालेय मुलांना देखील या भोजण प्रसादाचा लाभ मिळत असतो साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्रिस्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली चागल्या सुविधा साईभक्त भाविकांना देण्यासाठी अविरतपणे प्रयत्न केला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर साईभक्त भाविक शिर्डी येथे येत असतात