राहता तालुक्यातील बारा ग्रामपंचायती व तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी 735 अर्ज शेवटच्या दिवशी दाखल!
शिर्डी (प्रतिनिधी) राहता तालुक्यातील बारा ग्रामपंचायतच्या निवडणुका 5 नोव्हेंबर रोजी होत असून मतमोजणी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या बारा ग्रामपंचायत व तीन ग्रामपंचायत पोटनिवडणूक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 735 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
राहता तालुक्यात १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका व तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून शेवटच्या अर्ज दाखल करण्याचे दिवशी एकूण सातशे पस्तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत .या अर्जांची छाननी 23 ऑक्टोबर रोजी होणार असून उमेदवारी अर्ज 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत मागे घेता येणार आहेत. याच दिवशी चिन्हाचे वाटप होणार असून या ग्रामपंचायत साठी पाच नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे व सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी राहता तहसील कचेरीत विविध अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली टेबल लावण्यात आले असून राहत्याचे तहसीलदार अमोल मोरे यांच्या नेतृत्वाखाली येथे निवडणुकीचे व्यवस्थित नियोजन सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच उमेदवार आपले कार्यकर्त्यांसह राहता तहसील कार्यालयात आले होते. त्यामुळे येथे मोठी गर्दी झाली होती. अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीचे वारे या बाराही ग्रामपंचायत मध्ये जोरदार होऊ लागले असून आतापासूनच प्रचाराला सुरुवात झाली आहे.23 ऑक्टोबरला अर्जाची छाननी झाल्यानंतर व 25 ऑक्टोबरला अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र या ग्रामपंचायतीमध्ये स्पष्ट होणार आहे.