नांदेड रुग्णालयातील मृत्यूंवर CM शिंदेंची प्रतिक्रिया म्हणाले, “औषधांची, डॉक्टरांची कमतरता…”
सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुंबई | नांदेड मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर भाष्य केलं आहे. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले, ही घटना राज्य सराकरने गांभीर्याने घेतली आहे. संबंधितांना सूचना दिल्या आहे. संबंधित मंत्री घटनास्थळी गेले आहेत. या बाबतीत प्राथमिक माहिती घेतली असता रुग्णालयात औषधांचा साठा होता. औषध खरेदीसाठी आधीच १२ कोटी रुपये दिली आहे. रुग्णालयात औषधांचा जास्तीचा साठा होता. डॉक्टर आणि स्टाफ देखील होते. झालेल्या घटनेची चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल. मृत्यू झाल्यांमध्ये काही वयोवृद्ध लोक होत. अपघात केस होत्या काही लहान मुलं होती. ज्यांचे वजन कमी होते. अहवाल आल्यावर मी सविस्तर बोलेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.