Letest News
पोलिसांनीच त्यांची हत्या केली आहे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं राहुल गांधी ना.राधाकृष्ण विखे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर त्यांचा लोणी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सत्कार! shirdi news साईंच्या झोळीत साईभक्तांनी टाकले भरभरून दान गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता भट्टाचार्य साईंची मूर्ती खरंच झीझली आहे का? तज्ञांनी दिलेल्या सुचनेने चर्चेला उधान!!साई संस्थान मूर्तीची काळजी ... बनावट दर्शन पास या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशनला फिर्याद का नाही? shirdi saibababa news श्री साईबाबा संस्थानची नाताळ व नूतन वर्षाची तय्यारी पूर्ण प्रशासन सज्ज मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड...
Blog

शिर्डी येथे 23 ते 26 ऑक्टोबर दरम्यान श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव होणार साजरा! विविध कार्यक्रमांची तयारी जोरात!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव-२०२३ तयारी पूर्ण होत असून
सोमवार दिनांक २३ ऑक्‍टोबर ते गुरुवार दिनांक २६ ऑक्‍टोबर २०२३ या काळात श्री पुण्‍यतिथी(दसरा) उत्‍सव येथे विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
श्री साईबाबा संस्‍थाकडून १ लाख ७७ हजार ८७१ भक्‍तमंडळ सभासदांना श्री पुण्‍यतिथी(दसरा) उत्‍सवाचे निमंत्रण पत्रिका पाठविण्‍यात आलेल्‍या आहे.
संस्‍थानकडे श्री पुण्‍यतिथी(दसरा) उत्‍सवकरीता वेगवगळया ठिकाणांहुन येणा-या ०८ पालख्‍यांनी नोंदणी केलीली आहे. साईभक्‍तांचे सुविधेकरीता एकुण ६७ हजार ८०० चौ.फुट मंडप व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तर
श्रींच्या दर्शनानंतर मोफत बुंदी प्रसाद भक्तांना देण्‍यात येतो. त्यासाठी साई संस्थांनने यावर्षी ३ लाख मोफत बुंदी प्रसाद पाकिटे बनविण्‍याचे नियोजन केलेले आहे.
तसेच यावर्षी विक्रीसाठी ६ लाख नग प्रसाद लाडू बनविण्‍याचे नियोजन आहे. याकरीता गेट नंबर ०४ जवळ सेवाधाम व साईनाथ छाया इमारत, श्री साईनाथ मंगल कार्यालय,मारुती मंदिराशेजारी साई कॉम्‍प्‍लेक्‍स, श्री साईप्रसादालय तसेच सर्व निवासस्‍थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आलेले आहे.
यावर्षी उत्‍सव काळात अंदाजे २ लाखाहून अधिक साईभक्‍त प्रसाद भोजन घेतील . असा अंदाज असून तसे नियोजन करणेत आलेले आहे. यामध्‍ये पहिल्‍या दिवशी मुगडाळ शिरा, मुख्‍य दिवशी जिलेबी, तिसरे दिवशी राजा-राणी बुंदी व चौथे दिवशी बेसन बर्फी / खोबरा बर्फी हे मिष्‍ठान्‍न म्‍हणून प्रसाद भोजनात देणेत येणार आहे.
•भाविकांच्‍या सुविधेसाठी गुरुस्‍थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा, दर्शनरांग, नविन भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), साईआश्रम भक्‍तनिवास, साई धर्मशाळा, श्री साईप्रसादालय तसेच मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडप आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्‍यात आलेले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


या उत्‍सव काळात भाविकांच्‍या सुरक्षिततेसाठी संस्‍थान सुरक्षा रक्षक,आपतकालीन पथक, अधिकारी यांसह शिर्डी पोलीस स्‍टेशन अंतर्गत अतिरीक्‍त कर्मचारी असे एकुण १५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहे. तर मंदिर व निवासस्‍थान आणि श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी येणे-जाणे करीता जादा बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. अशी माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर यांनी दिली आहे.

kamlakar


शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे या वर्षीही सोमवार दिनांक २३ ऑक्‍टोबर ते गुरुवार दिनांक २६ ऑक्‍टोबर २०२३ या कालावधीत श्री साईबाबांचा १०५ वा पुण्‍यतिथी उत्सव साजरा करण्‍यात येणार असून साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून २४ ऑक्‍टोबर २०२३ रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्‍याचे सांगुन साईभक्‍तांनी या उत्‍सवात मोठ्या संख्‍येने सहभागी होवून उत्‍सवाची शोभा वाढवावी, असे आवाहनही संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी केले.


पी शिवा शंकर म्‍हणाले, श्री साईबाबांनी १०४ वर्षांपुर्वी दस-याच्‍या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्‍या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. त्‍यानंतर आजतागायत हा पुण्‍यतिथी उत्‍सव नव्‍या उत्‍साहात साजरा केला जात आहे. ज्‍यामुळे विजयादशमी म्‍हणजे श्री साईबाबांची पुण्‍यतिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्‍त हा उत्‍सव साजरा करतात. त्‍यानुसार दिनांक २३ ऑक्‍टोबर ते गुरुवार दिनांक २६ ऑक्‍टोबर २०२३ या काळात १०५ वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा करण्‍यात येत असून उत्‍सवानिमित्‍त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.
श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी सोमवार दिनांक २३ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ०६.०० वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्‍चरिताचे अखंड पारायण, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम होईल. सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते ०९.०० व रात्रौ ०९.३० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. अंदाजे रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती (पालखी मिरवणुक परत आल्‍यानंतर)होणार आहे. उत्‍सवाचा हा पहिला दिवस असल्‍यामुळे अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.


उत्‍सवाचे पारायणात अध्‍याय वाचनासाठी भाग घेऊ इच्छिणारे साईभक्‍तांनी रविवार, दि. २२/१०/२०२३ रोजी दुपारी ०१ ते सायंकाळी ०५.१५ वाजेपर्यंत समाधी मंदिरासमोरील स्‍टेजवर आपली नावे नोंदवावीत. नांव नोंदणी केलेल्‍या साईभक्‍तांची त्‍याच दिवशी त्‍याच ठिकाणी संध्‍याकाळी ०५.२० वाजता उपस्थित लहान मुलांच्‍या हाताने चिठ्ठया काढुन ( ड्रॉ पध्‍दतीने ) अध्‍याय वाचनासाठी निवड केली जाईल. त्‍यानंतर सायंकाळी ७.०० वाजेच्‍या दरम्‍यान त्‍या भाग्‍यवान अध्‍याय वाचकांची नांवे व्‍दारकामाईचे बाहेरील दर्शनीय भागात व समाधी मंदिर उत्‍तरेकडे बोर्डवर लावले जातील.


मंगळवार, दिनांक २४ ऑक्‍टोबर हा श्रींचे पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे. या दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्‍ती, श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते ०९.०० व रात्रौ ०९.३० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून श्रींच्‍या रथाची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० यावेळेत श्रींच्‍या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्‍यामुळे दिनांक २४ ऑक्‍टोबर रोजी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक २५ ऑक्‍टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही.


ज्‍या साईभक्‍तांना भिक्षाझोळी कार्यक्रमात भाग घ्‍यावयाचा असेल त्‍यांनी आपली नावे समाधी मंदिरासमोरील स्‍टेजवर सोमवार दि. २३/१०/२०२३ रोजी सकाळी ०८ ते ११.३० या कालावधीत नोंदवावीत. नांव नोंदणी केलेल्‍या साईभक्‍तांची त्‍याच दिवशी त्‍याच ठिकाणी दुपारी १.३० चे दरम्‍यान लहान मुलांचे हस्‍ते ड्रॉ पध्‍दतीने २० चिठ्ठया काढण्‍यात येतील व भाग्‍यवान भिक्षा झोळीधारकांची नांवे जाहिर केली जातील. हि नावे समाधी मंदिर बाहेरील नोटीस बोर्डवर लावणेत येतील.
उत्‍सवाच्‍या तृतिय दिवशी बुधवार, दिनांक २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा होईल. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत एकादशी कीर्तन कार्यक्रम होईल. सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते ०९.४५ यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार आहे.


उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी गुरुवार, दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता काकड आरती, सकाळी ०५.५० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०६.५० वाजता श्रींची पाद्यपूजा व सकाळी ०७.०० वाजता गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजेच्‍या दरम्‍यान श्रींची माध्‍यान्‍ह आरती, सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.३० ते ०९.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होईल. रात्रौ ९.१५ वाजता श्रींची पालखीची (गुरुवार नित्‍याची पालखी) मिरवणूक होऊन रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार असल्‍याचे पी शिवा शंकर यांनी सांगितले.
हा उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे , सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहेत.

श्री साईबाबांची पुण्‍यतिथी – पुर्वपिठीका
श्री साईबाबांची १०५ वा पुण्‍यतिथी उत्‍सव सोमवार दिनांक २३ ऑक्‍टोबर ते गुरुवार दिनांक २६ ऑक्‍टोबर २०२३ या काळात साजरा होणार आहे. या निमित्‍ताने पुण्‍यतिथी सोहळ्याची पुर्वपिठीका.
साईबाबांनी १०४ वर्षांपुर्वी दस-याच्‍या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्‍या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. त्‍यानंतर आजतागायत हा पुण्‍यतिथी उत्‍सव नव्‍या उत्‍साहात साजरा केला जात आहे. ज्‍यामुळे विजयादशमी म्‍हणजे साईबाबांची पुण्‍यतिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्‍त हा उत्‍सव साजरा करतात. श्रीक्षेत्र शिर्डी येथे या पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.


श्री साईसच्‍चरिताच्‍या ४२ व्‍या अध्‍यायात बाबांच्‍या महानिर्वाणाचे वर्णन करण्‍यात आले आहे. हेमाडपंत म्‍हणतात, बाबांचे एक भक्‍त रामचंद्र पाटील कोते एकदा अतिशय आजारी पडले. जीवावरचे संकट त्‍यांना सोसवत नव्‍हते. कोणताच उपाय बाकी राहीला नव्‍हता. जीव अगदी नकोसा होवून गेला. अशा अवस्‍थेत एका मध्‍यरात्री बाबांची मुर्ती एकाएकी रामचंद्र पाटलांच्‍या उशापाशी प्रकटली. रामचंद्र पाटलांनी बाबांचे पाय धरले आणि निराश होवून म्‍हणाले ‘मला मरण नक्‍की कधी येईल तेवढे सांगा. या आयुष्‍याचा कंटाळा आला आहे.’ त्‍यावर मुर्तीमंत करुणा असलेले बाबा म्‍हणाले, रामचंद्रा…उगाच चिंतातूर का होतोस काळजी करु नकोस तुझं गंडान्‍तर टळलं आहे. पण तात्‍या पाटलाची मला धडगत दिसत नाही. शके अठराशें चाळीस (शके १८४०) च्‍या दस-याच्‍या दिवशी तात्‍या मोक्षपदाला पावेल. परंतु ही गोष्‍ट तात्‍या जवळ बोलु नकोस. तो मनात धास्‍ती घेवून बसेल.


दिवस भराभर उलटू लागले. तशी तात्‍या पाटलांच्‍या मरणाची वेळ जवळ येवू लागली. रामचंद्र पाटलांची धास्‍तीही वाढू लागली. कारण बाबांचे बोल म्‍हणजे वज्रलेप! ते त्‍यांनी तात्‍या पाटलांपासून गुप्‍त ठेवले. पण कोणाकडे तरी मन मोकळं केल्‍याशिवाय त्‍यांना चैन पडेना. शेवटी ही गोष्‍ट त्‍यांनी बाळा शिंप्‍याला सांगितली आणि हे कोणालाही सांगू नकोस असं बजावलं. एकोणीसशें अठरा (१९१८) चा भाद्रपद सरला अश्विन लागणार तोच तात्‍या पाटलांनी अंथरुण धरले. तर दुसरीकडं बाबांनाही थंडी वाजून आली. तात्‍यांचा भरवसा बाबांवर आणि बाबांचा रक्षणकर्ता श्रीहरी होता. दुखण्‍याने त्रासलेल्‍या तात्‍यांचे चित्‍त बाबांकडे लागले होते. भेटीची ओढ लागली होती. परंतु त्‍यांना चालवतही नव्‍हते. दिवसेंदिवस दुखणे वाढत होते. औषधांना दाद न देता अनावर होत होते. बाबांनी भाकीत केलेला दिवस जवळ येत होता….बाबांचे म्‍हणणे आता खरं होणार या विचाराने रामचंद्र पाटील आणि बाळा शिंप्‍याची धास्‍ती वाढू लागली. शुध्‍द पक्षाची दशमी आली. तात्‍यांची नाडी कमी वाहू लागली. आप्‍तेष्‍ट घाबरून गेले. परंतु तात्‍यांच्‍या बाबतीत कुठलीच वाईट घटना घडणार नव्‍हती. आलेल्‍या काळाला परत जावे लागणार होते. आणि तसच झालं. तात्‍यांचे गंडान्‍तर टळले. तात्‍या राहीले आणि बाबांनी देह त्‍याग केला.


देहावसन जवळ आले तरी लक्ष ठेवून चारा-पाचांचा मेळ घालून बाबांनी लक्ष्‍मीबाई शिंदेना आपली आठवण म्‍हणून नऊ रुपये दिले. जवळ असलेल्‍या मंडळीना जेवायला पाठवून दिले. मनाने अस्‍वस्‍थ होते तरी आज्ञा झाल्‍याने ते जाण्‍यासाठी उठले. आज्ञेचे उल्‍लंघन करवेना, सोबतही सोडवेना आणि बाबांचे मनही मोडवेना. शेवटी सर्वजण वाड्यात जेवायला गेले. पण मन बाबांजवळ गुंतलेले होते. सारे जेवायला बसले. तेवढ्यात बोलावणे आले. हातातला घास तसाच टाकून सर्वजण व्‍दारकामाईकडे धावले. परंतु वेळ निघून गेली होती. बयाजी पाटलांच्‍या मांडीवर बाबांनी आपला देह ठेवला होता. दस-याचे बाबांना प्रेम का होते? तर साडेतीन मुहुर्तांपैकी दस-याचा हा मुहुर्त कोठेही जाण्‍यासाठी विशेष शुभ समजला जातो, हे सगळ्यांना चांगलेच ठाऊक आहे, परंतु हेही म्‍हणणे बरोबर नव्‍हे. ज्‍याला जाणे व येणेच नाही त्‍याला कोठून आले आहे निर्याण! मुहुर्ताचीही त्‍याला काया जरुरी ज्‍याला धर्माचे किंवा अधर्माचे बंधन नाही, ज्‍याची सर्व बंधने निवळली आहेत ज्‍याच्‍या प्राणाला निघून जाणे नाही त्‍याला निर्याण ते कसले! अशा साईमहाराजांना येणे किंवा जाणे नाही, मग निर्याण स्थिती तरी कोठली! आयुष्‍यामर्यादारुपी तेल संपल्‍यावर प्राणरुपी ज्‍योत मंद झाल्‍यावर बाबांचा देह बयाजी पाटलांच्‍या मांडीवर विसवला.

नाही पडून किंवा निजून पण स्‍वस्‍थपणे गादीवर बसून, असा प्रकारे आपल्‍या हस्‍ते दानधर्म करुन बाबांनी आपल्‍या देहाचे विसर्जन केले. साईसमर्थांचे मनोगत कोणालाही न कळता त्‍यांनी हातोहात आपला देह टाकला आणि ते ब्रह्मीभूत झाले. देहाचा व मायेचा बुरखा पांघरुन संत या जगात अवतार घेतात आणि लोकांचा उध्‍दार करण्‍याचे कार्य संपले म्‍हणजे लगेच अव्‍यक्‍तात समरस होऊन जातात. बाबांनी आपला देह आपल्‍या भक्‍तांकरीता आजन्‍म कष्‍टविला. त्‍या स्‍मरणार्थ दरवर्षी त्‍यांची पुण्‍यतिथी साजरी करण्‍याचा निर्णय तत्‍कालीन भक्‍तांनी घेतला. पुर्वपरंपरा पाहिली तर पुण्‍यतिथी साजरी करणे हे महत्‍पुण्‍य आहे. वर्षभर घरोघरी प्रत्‍येक जण आराधना करतच असतो. परंतू त्‍याची पुर्तता करण्‍याकरता व सदगुरुंच्‍या आशिर्वाद घेण्‍याकरीता पुण्‍यतिथीच्‍या दिनी समाधीस्‍थानीच आले पाहिजे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button