शिर्डीला साई दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांच्या भाडोत्री मारुती व्हनलालागली आग!
शिर्डी प्रतिनिधी/ मारुती व्हॅन कारमध्ये गॅस भरताना आग लागल्याची खळबळ जनक घटना येवल्याच्या मुलतानपुरा भागात घडली असून आगीत दहा साईभक्त प्रवासी भाविक जखमी झाले आहे त्यात तीन लहान बालक आणि एका महिलेचा समावेश असून काहींना उपजिल्हा रुग्णालय तर काहींना खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. चालक अवैध गॅसच्या अड्डयावर गॅस भरण्यासाठी मारुती घेऊन गेला होता गॅस भरत असतांना ही घटना घडली.आहे
नांदेड जिल्ह्यातील पूर्णा जखमी झालेले प्रवाशी असल्याची माहिती पुढे आली आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक १७ नोव्हेंबर२०२३ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथून शिर्डीतील साईदर्शनासाठी आलेलं कुटुंब नगरसुल रेल्वे स्टेशनवर दाखल झाले होते. यावेळी नगरसुल येथून दुसऱ्या खाजगी वाहनाने ते येवल्यात आले. येवल्यातून शिर्डीसाठी त्यांनी एक मारुती व्हॅन कार भाडोत्री घेतली होती. या कारमध्ये गॅस भरत असताना हा भीषण स्फोट झाला. येवला शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या पक्की मज्जिद भागामध्ये ही घटना घडली आहे.
जखमींमध्ये दहा व्यक्तींचा समावेश असून चार लहान बालके आहेत. यात एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.चालकाने येवल्यात आल्यानंतर एका ठिकाणी सुरु असलेल्या अवैध गॅसच्या अड्डयावर गाडी घेऊन गेला. तेथे गॅस भरत असतांना अचानक आग लागली. आग लागल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणून जखमीना हॉस्पिटल मध्ये दाखल केले घटनेनंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे
या घटनेनंतर येवला पोलीसांनी येवला शिर्डी महामार्गावर गॅसवर चालत असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केल्यानंतर अनेक वाहने रस्त्यावर बेपत्ता झाली होती काही दिवसांपूर्वी शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी बेकायदेशीर गॅस भरत असलेल्या ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर जप्त केले होते मात्र कारवाईचा धाक वाटत नसल्यामुळे हे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत