शिर्डी( प्रतिनिधी) गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून येथील दहशतीचे झाकण उघडण्यास सुरुवात झाली असून या तालुक्याची दहशत लवकरच संपवणार आहे. असे मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच शिर्डीला भेट देऊन शिर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक सुरेश हारणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत त्यांना आपले आपणास नेहमी पाठबळ राहील असे दाखवून दिले. यावेळी आ.थोरात यांनी म्हटले की, या तालुक्यात गणेश साखर कारखान्यापासून दहशतीचे झाकण उडाले आहे. मात्र तरीही येथे दबाव तंत्राचा वापर करून या दहशतीला विरोध करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. परंतु या दहशत व दबाव तंत्राला कोणीही घाबरू नये. आम्ही आपल्या मागे भक्कमपणे उभे राहू, असे आश्वासनही आमदार थोरात यांनी यावेळी दिले.
यावेळी सुरेश आरणे यांनी आमदार थोरात यांचा सत्कार केला. यावेळी सचिन चौघुले,प्रवीणआल्हाट,बाबासाहेब डांगे,अशोक जपे,अविनाश शेजवळ, सुनील कुमावत(परदेशी) बाबा दिवे,भाऊसाहेब आव्हाड,संतोष संतोष वाघमारे, ज्ञानेश्वर हातांगळे, किरण शेलार, शिवाजी भोंडगे,योहान गायकवाड, प्रशांत वाघ, गौतम त्रिभुवन, विजय गायकवाड, भगवान चव्हाण, अनिल आरणे, नजीर कादरी, सोमनाथ वारुळे, शैलेश चंदनशिव, किरण गायकवाड, नितीन आरणे, नवनाथ गायकवाड, रवी शिंदे, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.