शिर्डी येथील श्री राजा वीरभद्र ची 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान भव्य यात्रा!
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील बिरोबा बनतील श्री राजा वीरभद्राची भव्य यात्रा शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 ते सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत भरणार असून त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिर्डी जवळ नैसर्गिक वातावरणात असलेले श्री. बिरोबा मंदीर हे आपल्या परिसरातील एक दिव्य व धार्मिक ठिकाण असून श्री. बिरोबा म्हणजेच वीरभद्र हे आजच्या आधुनिक युगातील एक चमत्कार असून देवी शक्ती जागृत साक्षात्काराचा पुतळा आहे.
शिर्डी जवळ श्री राजा वीरभद्राचे भव्य दिव्य असे मंदिर असून येथे रंगीबेरंगी सुंदर काचेने आकर्षक अशी मंदिरात सजावट करण्यात आलेली आहे. अशा भव्य दिव्य श्री राजा वीरभद्राची यात्रा 25 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत येथे भरणार असून त्यानिमित्ताने 25 नोव्हेंबर 2023 शनिवार रोजी सकाळी पाच वाजता श्रींची पूजा, अभंग स्नान,सकाळी पाच ते सहा गंगेच्या पाण्याची कावडीची मिरवणूक, सकाळी सात ते पाच गावातून श्री वीरभद्र महाराजांच्या रथाची व काठीची भव्य मिरवणूक होणार आहे. त्यानंतर रात्री आठ ते रात्री साडेबारा यावेळेस. डफांचा खेळ, रात्री साडेबारा वाजता तरोडाचा कार्यक्रम ,त्यानंतर रात्री एक वाजता श्रींच्या व्हईकाचा कार्यक्रम व नंतर जागरणाचा कार्यक्रम होणार आहे.
रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता यात्रा, श्रींच्या गणाचा कार्यक्रम तसेच रात्री आठ ते 11 पर्यंत हभप रामकृष्ण महाराज शिंदे व गंगाराम महाराज थोरे यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दिनांक 27 नंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता हभप.श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दुपारी दोन ते सहा पर्यंत भव्य जंगी कुस्त्यांचा हंगामा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या सहकार्याने होणार आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत येथे भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होणार आहे. तरी सर्व भाविकांनी यात्रेचा व दर्शनाचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री.वीरभद्र दल, श्री वीरभद्र भक्त मंडळ, ग्रामस्थ शिर्डी, यांनी केले आहे.