कमलाकर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ व व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने संस्थांनच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची घेतली भेट!
शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी मध्ये साईदर्शनासाठी नूतन दर्शनरांग सुरू झाल्यानंतर साईभंक्ताच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे नेते जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे मुंख्यकार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर व उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांची ग्रामस्थ व व्यापारी यांच्या शिष्टमंडळांने भेट घेऊन साई दर्शनासाठी पूर्वी असणारे आत आणि बाहेर जाणारे येणारे चारही साई संस्थान मंदीराचे गेट तात्काळ सुरु करावे. यासह काही मागण्या ह्यावेळी करण्यात आल्या .
कमलाकर कोते यांनी यावेळी बोलताना सांगितले की , पूर्वी सुरू असणारे साई उद्यान,नाट्यगृह,सेवाधाम ईमारत, लाडू,मोबाईल,चप्पल स्टॅन्ड व जनसंपर्क कार्यालय सुरु करावे. संरक्षण विभागात् वर्षानुवर्षं एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या तात्काळ कराव्यात. काही विभागाचा अनुभव आहे .म्हणून त्या ठिकाणी अनेक वर्ष कर्मचारी काम करीत आहेत. मात्र यापैकी काही कर्मचाऱ्यांचा अनुभवाचा फायदा न होता साईभक्त भाविकांना तोटाच होत आहे . अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे गरजेचे आहे. तसेच साई भक्तांना मनमोकळे व समाधान पूर्वक साईसमाधी दर्शन व्हावे. यासाठी समाधीवर लावलेली काच तात्काळ काढण्याची गरज आहे .
साईभक्तां सोबत गैरवर्तन करणारे कर्मचारी यांच्यावर बडतर्फेची कारवाई केली जावी. . पिपळवाडी रोड तात्काळ पूर्णपणे खुला करा. शिर्डीत नवीन दर्शन रांग सुरू झाल्यामुळे पिंपळवाडी रोड गेट नंबर तीन समोर, राधाकृष्ण विखे पाटील कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी पूर्वी असणारी गर्दी आता नवीन दर्शन रांग सुरू झाल्यामुळे होत नाही त्यामुळे येथील दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तेव्हा ग्रामस्थ दुकानदार व साईभक्त यांचा विचार करून पूर्वीचे चारही गेट सुरू करावे.आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी मोठया प्रमाणात ग्रामस्थ, व व्यापारी उपस्थित होते.