शिर्डी (प्रतिनिधी) अ.नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या आठ हजार शिवदुतासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी भेट म्हणून मिठाई व शासनाच्या कल्याणकारी योजनाची पुस्तिका भेट म्हणून पाठवले असून त्याचे वितरण नुकतेच खा. सदाशिव लोखडे यांचे नेत्ववाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते शिवसेनेचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतेच शिर्डी येथे करण्यात आले. अशी माहिती कमलाकर कोते यांनी दिली आहे.
यावेळी कमलाकर कोते म्हणाले, नगर जिल्ह्यात शिवसेनेचे आठ हजार शिवदुत असुन त्यांना पहिल्यांदाच दिवाळी भेट म्हणून मिठाई व पुस्तिका देण्यात येत असून यात मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे हे विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने महिलांच्या कल्याणकारी ज्या योजना राबवल्या आहेत.
त्या योजनांची माहिती या पुस्तके मध्ये देण्यात आली आहे. राज्यसरकार च्या विविध योजनाची प्रगतीची माहिती सर्वसामान्यांच्या हिताच्या लोककल्याणकारी योजनांची व महिलांच्या सशक्तीकरणाची माहिती देखील दिली जात आहे. महिलांना सामाजिक शैक्षणिक व आर्थिक सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार व लोकसहभागातून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राज्य सरकार राबवत आहे .ज्या दोन कोटी महिलांना शक्ती गटाशी जोडणे, एक कोटी महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे. दहा लाख महिलांना तांत्रिक व रोजगार प्रशिक्षण देणे. पाच लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल उपलब्ध करून देणे.
दहा लाख महिला उद्योजकांना बाजारपेठेत ग्राहक उपलब्ध करून देणे. असा राज्य सरकारचा मानस आहे. शासनाच्या विविध योजना सर्वांना सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून शिवदूतांच्या सहकार्याने हे काम पूर्ण केले जात असल्याचे कमलाकर कोते यांनी सांगितले. या प्रसगी बाजीराव दराडे,बाळासाहेब पवार,विमलताई पुंडे,कावेरी नवले,राजेद्र देवकर,शुभम वाघ,विठ्ठल घोरपडे,महेशदेशमुख,संजय वाकचैारे,रावसाहे थोरात,रमेशकाळे,राजेद्र सोनवणे,बापु शेरकर,मनिल नराडे,देवा लोखडे,एकनाथ यादव,सुरेश कागुणे,संजय पवार,बाबासाहेब कागुणे,सदा गोदकर,रवि वाघ,अक्षय जाधव,अक्षय सदाफळ,पुनम जाधव,मिनाक्षी वाकचौरे,सुनिता शेळके,मिरा गुंजाळ, रामभाऊ रहाणे,, रणजीत ढेरंगे आदी पदाधिकरी तालुका स्तरावर वाटप करत आहेत.