शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डीत तुम्हाला हॉटेल चालवायचे असेल तर दोन लाख रुपये द्या. नाहीतर तुझ्या मालकाला ठार मारून टाकीन अशी धमकी देऊन शिवीगाळ करणाऱ्या इसमा्च्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी,कि, हॉटेल चालक यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की ,शिर्डी येथे साई संस्थांनच्या 1000 रूम निवासस्थाना जवळ हॉटेल असून येथे मॅनेजर म्हणून आपण काम करत असून 21 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान विजय शेळके हा हॉटेल मध्ये आला.
त्याने हॉटेलचा कामगारला तुझा मालक कोठे आहे त्याला बोलव! असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी मी काउंटरवर बसलेलो होतो. मी उठून विजय शेळके यांच्या जवळ आल्यानंतर त्यांने मलाही शिवीगाळ करत तुझा मालक कुठे गेला तुमचे हॉटेल खूप चालते धंदा मोठा होतो. तुम्हाला शिर्डीत हॉटेल चालवायचे असेल तर उद्या 22 नोव्हेंबर 2023 रोजी दोन लाख रुपये मला द्यावे लागतील. व येथून पुढे दर महिन्याला तुम्हाला मला पैसे द्यावे लागतील. अन्यथा तुझ्या मालकाला ठार मारू असे म्हणून मलाही शिवीगाळ केली. अशा आशयाची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात हॉटेल चालकाने विजय शेळके शिर्डी याच्या विरोधात दाखल केली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 1051 नुसार भादवि कलम 294/ 387 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.