कोट्याधीश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईंच्या झोळीत कोट्याधीश रुपये अर्पण
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान ला मोठ्या संख्येने साईभक्त साई दर्शनासाठी येत असतात व मनोभावे श्रद्धेने देणगी देत असतात. सण उत्सव व सुट्ट्यांच्या काळात संस्थांनला देणगी मिळण्याचे प्रमाणही वाढत असते.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी येथे दिवाळी सुट्ट्यांमध्ये दिनांक १० नोव्हेंबर ते दिनांक २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत संस्थानला रुपये १७ कोटी ५० लाख ५६ हजार ०८६ इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.शिवा शंकर म्हणाले की, दिनांक १० नोव्हेंबर ते दिनांक २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत रुपये १७ कोटी ५० लाख ५६ हजार ०८६ प्राप्त झाली आहे. यामध्ये रोख स्वरुपात रुपये ०७ कोटी २२ लाख ३९ हजार ७९४ दक्षिणा पेटीत प्राप्त झाली असून, देणगी काऊंटर ०३ कोटी ९८ लाख १९ हजार ३४८ रुपये, पी.आर.ओ.सशुल्क पास देणगी ०२ कोटी ३१ लाख ८५ हजार ६००, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर ०३ कोटी ७० लाख ९४ हजार ४२३, तर सोने ४२५.८१० ग्रॅम रक्कम रुपये २२ लाख ६७ हजार १८९ व चांदी ८२११.२०० ग्रॅम रक्कम रुपये ०४ लाख, ४९ हजार ७३२ यांचा समावेश आहे.
कोट्याधीश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईंच्या झोळीत कोट्याधीश रुपये दिवाळीच्या सुट्यांमध्ये आलेल्या भक्तांनी केले. गर्दीच्या काळात साई संस्थांनने सर्व सुविधा भक्तांना पुरवल्या. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. म्हणून संस्थांनचे अध्यक्ष यार्लागड्डा यांनी सर्व साईभक्तांचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.