क्रांतीगुरु समीर रामचंद्र वीर यांना यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार जाहीर!
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय लहुजी सेनेचे कार्याध्यक्ष समीर (अण्णा) रामचंद्र वीर यांना नुकताच क्रांती गुरु लहुजी साळवे समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचे सर्व क्षेत्र मधून अभिनंदन होत आहे.
समीर रामचंद्र वीर यांना हा बहुमानाचा क्रांती गुरु लहुजी साळवे समाजभूषण पुरस्कार 30 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे.अशी माहिती भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव आणि भाई पठाण व कायदेशीर सल्लागार ॲड रमेश कोळेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
समीर वीर हे शिर्डीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी चळवळीत नेहमी सक्रिय असतात. प्रत्येक सामाजिक कार्याध्ये स्वतःला झोकून देऊन काम करतात. सार्वजनिक सण उत्सव काळात त्याचे मोठे कार्य असून या सर्व कार्याची दखल घेत त्यांना क्रांती गुरु लहुजी साळवे समाजभूषण श्रीरामपूर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराने 30 नोव्हेंबर 2023 रोजी गौरवण्यात येणार आहे.
समीर वीर यांना हा पुरस्कार जाहीर जाहीर झाल्यानंतर त्यांचा सर्व क्षेत्रांमधून सत्कार व अभिनंदन करण्यात येत आहे.