स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेने मुळेच राज्यातील महिला सुरक्षित महिला संपर्क प्रमुख सौ गव्हाणे
शिवसैनिकांमुळेच महिला सुरक्षित.: सौ. सुरेखा गव्हाणे
शिर्डी : ( वार्ताहर )महाराष्ट्रात नाही तर देशात विकृत मनोवृत्तीतून महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसाचाराचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यामुळे देशात महिला आज असुरक्षिततेच्या छायेखाली जगत आहेत. उत्तम घर चालवणारी महिला देखील निर्णय स्वातंत्र्य, आरक्षण आणि संरक्षण दिल्यास राजकारणातही यशस्वी होवू शकते. महाराष्ट्रातील बहुतांश महिलांचा हा विश्वास फक्त शिवसेनेवरच आहे. माता भगिनींचं संरक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब नेहमीच आग्रही होते. त्यांच्या विचारांचे वारसदार असलेल्या मुख्यमंत्री मा. नाम. श्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच यापुढेही महिलांच संरक्षण करु शकते. असा विश्वास शिर्डी लोकसभा शिवसेनेच्या महिला आघाडी संपर्क प्रमुख सौ. सुरेखा गव्हाणे यांनी महिलांच्या बैठकीत व्यक्त केला. संपर्क प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच त्यांनी शिर्डी येथे मतदारसंघात महिला पदाधिकारी आणि महिला सदस्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत.
सुरेखाताई गव्हाणेंच्या मार्गदर्शनामुळे महिलांमध्ये चैतन्य संचारले असून महिला आघाडीच्या कार्यास गती मिळेल असा विश्वास जिल्हा प्रमुख सौ. विमलताई पुंडे यांनी व्यक्त केला.
शिवसेना खासदार श्री. सदाशिवराव लोखंडे, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते तसेच महिला आघाडीच्या वतीने संपर्क प्रमुख गव्हाणे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा प्रमुख सौ. विमलताई पुंडे, कोपरगाव तालुका प्रमुख मिनाक्षी वाकचौरे, सुनीता शेळके, अर्चनाताई निबे, अनिता ताई धनक, विजया धोंड, वनिता जाधव, रोहिणी पुंडे, शिल्पा पवार, राणी पुंडे, स्वाती हासे, मंगल खोकले, उषाताई दुशिंग, सुनीता कुलकर्णी, उषाताई शिंदे, मंगल भगत, वृषाली सोनवणे आदी अनेक महिला उपस्थित होत्या.
शिवसेना महिला आघाडीच्या या बैठकीसाठी खासदार सदाशिवराव लोखंडे, उत्तर नगर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, माजी शहरप्रमुख दत्ता पु़ंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.