शिर्डीला क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर व खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन घेतले श्री साई दर्शन!
शिर्डी( प्रतिनिधी)शिर्डी येथे माजी क्रिकेटपटू श्री.दिलीप वेंगसरकर यांनी सपत्नीक भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
माजी क्रिकेटपटू श्री.दिलीप वेंगसरकर यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी शाल श्री साईबाबा ची मूर्ती देऊन केला. तसेच
खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे यावेळी मंदीर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.