एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार यादी चा कार्यक्रम घोषित!*
शिर्डी (प्रतिनिधी)
श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड शिर्डी तालुका राहता व्यवस्थापक समिती पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम 2023 -24 ते 2018- 29 मतदार यादी चा कार्यक्रम नुकताच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांनी घोषित केला आहे.
या कार्यक्रमानुसार शिर्डी येथील साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे ची तारीख 29/ 11/ 2023 सकाळी अकरा वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राहता व संस्थेचे कार्यालयात करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदार यादीवर हरकती स्वीकारण्यासाठी 29/ 11/ 2023 ते 8 डिसेंबर 2023 सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर कार्यालयात घेण्यात येणार आहेत. आलेल्या हरकतींवर निर्णय 18 डिसेंबर २०२३ रोजी दुपारी चार वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर कार्यालयात देण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 26 डिसेंबर 2023 सकाळी 11 वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राहता यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती श्री.गणेश पुरी.
जिल्हा सहकारी निवडणुका अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांनी संस्थेच्या सभासदांसाठी प्रसिद्ध केली आहे.