स्पा सेंटरच्या नावाखाली शिर्डीत चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा!
शिर्डी ( प्रतिनिधी):
शिर्डी येथील पिंपळवाडी रोडचे बाजूस द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यानंतर शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 4 पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे. एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके , पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, एपीआय योगिता कोकाटे, हे. कॉन्स्टेबल, इरफान शेख, HC अशोक शिंदे,HC बाबा खेडकर , LPC सुनंदा भारमल,PN श्याम जाधव,PC दिनेश कांबळे,PC सोमेश गरदास, चालक HC आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे..
शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. येथे वेगवेगळ्या प्रकाराने हाय प्रोफाईल सेक्स सारखे अवैध धंदे सुरू आहेत. मसाज सेंटर, पार्लर, मालिश केंद्रे, स्पा सेंटर, आधी विविध प्रकरणे व्यवसाय केला जातो .मात्र या व्यवसायाच्या आडून सेक्स रॅकेट चालवले जाते. अधिक पैसा कमवण्यासाठी अशा पद्धतीने हे सेक्स रॅकेट चालवून व परप्रांतीय पीडित मुलींना आपल्या जाळ्यात ओढून असे अवैध धंदे येथे होत आहेत. त्यामुळे धार्मिक क्षेत्राची विनाकारण बदनामी होते. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक व शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी या प्रकाराकडे अधिका अधिक लक्ष देऊन असे प्रकार येथे चालू नये किंवा परत सुरू होवू नये म्हणून लक्ष द्यावे .अशी मागणी नागरिकांनी , विशेषतः महिला वर्गातून होत आहे.