शिर्डी शहरात साईभक्त भाविकांच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या लटकुवर कारवाई करा साईभक्त भाविकाची थेट मुख्यमंत्री शिंदेना सांकडे
शिर्डी (प्रतिनिधी/
शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्त येत असतात. अनेक साईभक्त हे नगर मनमाड महामार्गाने आपल्या खाजगी प्रवासी वाहनातून येत असताना अनेक लटकू निघोज,निमगाव, शासकीय विश्रामगृह साकुरी शिव पासूनच साईभक्तांच्या वाहनाचा मोटरसायकलवर भरधाव वेगाने पाठलाग करत त्यांना थांबवून हार प्रसाद,रूम घेण्यासाठी लकडा लावतात. मात्र त्यामुळे रात्रीच्या वेळी साईभक्त अचानक हा प्रकार पाहून घाबरतात, कधीतर अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
त्यामुळे या शनिशिंगणापूर प्रमाणे शिर्डीत वाढत्या लटकूंचे प्रमाण धक्कादायक असुन तात्कालिक डि वाय एस पी सोमनाथ वाकचौरे याच्या काळात जशा कारवाई पोलिसांनी करून पायबंद बसवला होता त्या धर्तीवर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला उपविभाग आधिकारी संदीप मिटके यांनी प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामस्थ व साईभक्तांकडून पुढे आली असून एका साईभक्त भाविकाने थेट या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे लक्ष वेधण्यासाठी लेखी अर्ज केल्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे
शिर्डी मध्ये नगर मनमाड या महामार्गाने शिर्डीत येणाऱ्यांची साईभक्तांची संख्या अधिक आहे. मात्र साईभक्तांची वाहने निघोज निमगाव साकुरी शिवा कडून शिर्डी कडे येताना दिसताच अनेक तरुण हे मोटरसायकलवर निमगाव निघोज परिसरात थांबलेले असतात. ते या वाहनांच्या पाठीमागे भरधाव वेगाने येतात. वाहनांना अनेकदा हात करून थांबवतात. वाहनांच्या खिडक्यांच्या काचा उघडण्यास भाग पाडतात .अशावेळी वाहन चालक,व वाहनांमधील साईभक्त नेमका हा प्रकार काय आहे? हे पाहून त्यामुळे घाबरून जातात ,कधी कधी अचानक हा प्रकारामुळे छोटे-मोठे अपघात होतात.
या अनेक प्रवासी वाहनांमध्ये लहान मुले ,वृद्ध महिला साई भक्त असतात .त्याही या प्रकारामुळे गडबडून जातात. मात्र हे लटकू साई भक्तांना आपल्या दुकानावर चला, रूम घ्या ,हार प्रसाद घ्या असा आग्रह करतात. कमिशन मिळण्यासाठी ही त्यांची धडपड शनिशिंगणापूर प्रमाणे शिर्डीतही सुरू झाली असून या लटकूं मुळे साई भक्तांना मोठा त्रास सुरू झाला आहे.
तरी शिर्डीचे कर्तव्यदक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके तसेच पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट यांनी ह्या प्रकाराकडे विशेष लक्ष घालून असा हा शनिशिंगणापूर प्रमाणे शिर्डीतही सुरू झालेला लटकूंचा साईभक्तांना होणारा त्रास बंद केला पाहिजे साईभक्त ग्राहक वाढवण्यासाठी काही दुकानदारानी जुनाट दुचाकी घेऊन आर्थिक मदत या तरुणांना दिल्यामुळे लटकूंची सध्या धक्कादायक वाढत आहे तोंडात गुटखा वाढलेली दांढी व नशा करून हे तरुण थेट साईभक्त भाविकाशी संवाद करून शिर्डी चा चुकीचा संदेश बाहेर पाठवत आहे तो वेळीच रोखणे काळाची गरज आहे