छावा क्रांतिवीर सेनेचे वादळ नगर जिल्ह्यात तयार करण्यासाठी कामाला लागा एक जानेवारीला हजारो कार्यकर्ते नाशिक वर्धापन दिनाला आले पाहिजे यासाठी नियोजन करा- करण गायकर
सद्गुरु साईनाथांचे दर्शन घेऊन शहरात रॅलीच्या माध्यमातून शिर्डी शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार घालून छावा क्रांतिवीर सेनेच्या शिर्डी येथे होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्याला सुरुवात केली.
साई पालखी निवारा शिर्डी या ठिकाणी आज छावा क्रांतिवीर सेनेच्या ४ दिवसीय दौऱ्याची सांगता मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.
आज शिर्डी येथे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर जिल्हा विभागीय पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे,युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे,राज्य उपाध्यक्ष सुभाष भाऊ गायकर, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनोरमा ताई पाटील,आयटी प्रदेश संपर्कप्रमुख वैभव दळवी,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी संगीताताई सूर्यवंशी,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप राऊत,महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष जयश्री ताई वाकचौरे,नाशिक जिल्हाप्रमुख ग्रामीण नवनाथ वैराळ,जिल्हा सरचिटणीस सागर शेजवळ,विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख गिरीश आहेर,युवक जिल्हा उपाध्यक्ष करण शिंदे,महिला आघाडी नाशिक जिल्हा प्रमुख साधनाताई गांगुर्डे,च्या प्रमुख उपस्थितीत हा मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला.
यावेळी महासचिव शिवाजीराजे मोरे यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना सांगितले की आज चार दिवसाचा दौरा करत असताना छावा क्रांतिवीर सेना प्रत्येक जिल्ह्यामध्ये ताकतीन मोठी होत असून सर्व पदाधिकारी तन-मन-धनाने संघटन वाढीसाठी काम करताय नगर जिल्ह्यात सुद्धा त्याच पद्धतीने आपण संघटना वाढीसाठी काम करावे येणारा काळ निश्चित हा छावा क्रांतिवीर सेनेचा नगर जिल्ह्यात असेल असा मला विश्वास आहे.आपल्या सगळ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख गिरीश आहेर यांनी मार्गदर्शन करताना एक जानेवारी रोजी नाशिक येथे होणाऱ्या वर्धापन दिनाचे निमंत्रण दिले आपण सगळ्यांनी संघटना काय आहे संघटनेचे विचार ध्येयधोरण समजून घ्यायचे असेल तर नाशिक येथे मोठ्या संख्येने सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहा असे आव्हान केले.
अध्यक्ष भाषण करताना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी जिल्हाप्रमुख अविनाश शिंदे यांचे विशेष कौतुक केले नवीन जबाबदारी स्वीकारल्यापासून अविनाशने मनापासून संघटना वाढीसाठी काम केले त्याचा आज हे समोर आपल्याला फलित दिसते आहे कुठल्याही पदाधिकाऱ्याने संघटनेला आपले कुटुंब मानले तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे आज आपण बघतो आहे.छावा क्रांतिवीर सेनेत काम करत असताना कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना घाबरायची गरज नाही संघटन ही एक चळवळ आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाच्या पाठीमागे संघटना ठामपणे उभे राहील तुम्ही काम करत असताना कुठेही तुम्हाला अडचण निर्माण झाली तर त्या ठिकाणी संघटनेचे सर्व पदाधिकारी तुमच्यासाठी धावून येतील हा विश्वास आज मी तुम्हाला देतो येणाऱ्या काळात नगर जिल्ह्यामध्ये निश्चितपणे छावा क्रांतिवीर सेनेचे मोठे जाळे आपल्या माध्यमातून उभे राहील
अविनाश ला या कामांमध्ये मदत करत असताना संदीप राऊत जयश्री ताई वाकचौरे यांचीही मोलाची साथ लाभत असल्याने गट तटाच्या राजकारणात न पडता आपण एकमेकांचे सहकारी आहोत एकमेकाला मदत करून आपण चांगलं काम उभा करू शकतो हा विचार आज नगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी दिल्याने आजच्या बैठकीला हे स्वरूप आपल्यासमोर दिसतो या गोष्टीचा मनोमन आनंद आहे. गावनिहाय तुम्ही इथून पुढे संघटना वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे प्रत्येक गावात संघटनेचा पदाधिकारी शाखा आपल्याला कशी करता येईल या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आपल्या सगळ्यांना पुढील वाटचालीस मी मनापासून शुभेच्छा देतो. आज साईबाबांच्या आशीर्वादाने तुम्ही क्रांतिवीर सेनेला खूप चांगली टीम मिळाल्याने यापुढे नक्कीच नगर जिल्हा हा अग्रक्र क्रमांकाने महाराष्ट्रात काम करील असा विश्वास मला वाटतो अविनाश आणि त्याच्या टीमचे परत एकदा मनापासून अभिनंदन करून आजच्या या सांगता दौऱ्याला चार दिवस ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली त्या सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार व्यक्त करताना जिल्हाप्रमुख अविनाश शिंदे यांनी संकल्प केला येत्या दोन महिन्यांमध्ये नगर जिल्ह्यात छावा क्रांतिवीर सेनेचे वादळ निर्माण करू एक तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त पदाधिकारी आणण्याचाही प्रयत्न करू.संस्थापक अध्यक्ष यांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आजच्या मिटींगला आपण सर्वांनी जी उपस्थिती लावली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त केले.
मीटिंग यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रमुख अविनाश शिंदे,शिवाजीराजे चौधरी,नानकजी सावंत्रे,शुभम शिंदे, आकाश गाडे,संदीप वाघ,राहुल शिंदे,तुषार बाराते.युवक आघाडी उपजिल्हाप्रमुख प्रशांत सूर्यवंशी,जिल्हा संपर्कप्रमुख रेखाताई पाटील,जिल्हा सचिव सविताताई वाघ रूपालीताई काकडे निर्मलाताई नारखेडे सूर्यवंशी सुभाष उपाध्ये, गणेश शिंदे,बाबासाहेब माडेकर,अतुल चौधरी, विजू साळवे, शंकर डांगे, बबलू साळुंखे, आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.