साई संस्थान सोसायटीच्या १७ जागेसाठी ५३ उमेदवार रिंगणात
शिर्डी (प्रतिनिधी)- साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी १३३ पैकी ८० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १७ जागांसाठी ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. निवडणुकीत तीन पॅनलने उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उभे केल्याने ही निवडणूक तिरंगी होणार असून यात दोन अपक्ष उमेदवार निवडणूक लढविणार असल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.
शिर्डी साईबाबा संस्थानच्या एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या निवडणुकीसाठी १७ जागांसाठी १३३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ३० जानेवारी मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ८० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ५३ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाकी राहिले आहेत. सत्ताधारी गटाचे माजी चेअरमन श्रद्धा विजय कोते व तुषार शेळके यांनी निवडणुकीतून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सत्ताधारी गटाकडून यादवराव
कोते व प्रताप कोते यांनी साई जनसेवा पॅनल तसेच विद्यमान संचालक विठ्ठल पवार यांनी परिवर्तन विकास मंडळ व माजी चेअरमन राजेंद्र जगताप यांनी साई हनुमान जनसेवा असे स्वतंत्र पॅनल तयार केल्याने ही निवडणूक तिरंगी होणार आहे.
अरुण जाधव स्वतंत्र पॅनल तयार करणार होते परंतु त्यांनी साई जन सेवा मंडळाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. अमृत जगताप व किरण भोसले यांनी अपक्ष निवडणूक लढवायचे ठरवले. साई जनसेवा पॅनलकडून यादवराव कोते, प्रतापराव कोते, अरुण जाधव, सुनील डांगे, रवींद्र चौधरी, बाळासाहेब थोरात, प्रल्हाद कर्डिले, बाळासाहेब पाचोरे, बापूसाहेब गायके, डॉ. संदीप शेळके, डॉ. महिंद्र तांबे, मनोज साबळे, विजय हिरे, जयराम कांदळकर, राजेंद्र भालेराव, वैशाली सुर्वे, मीना वाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर परिवर्तन विकास मंडळाकडून पोपटराव कोते, भाऊसाहेब कोकाटे, रवींद्र गायकवाड, मिलिंद दुबळे, संभाजी तुरकणे, इकबाल तांबोळी, विनोद कोते, तुळशीराम पवार, देविदास जगताप, कृष्णा आरणे,
भाऊसाहेब लवांडे, महादू कांदळकर, विठ्ठल पवार, संभाजी गागरे, गणेश आहेर, सुनंदा जगताप, लता बारसे, यांनी उमेदवार अर्ज दाखल केले. साई हनुमान जनसेवा पॅनलकडून बापूसाहेब कोते, डॉ. प्रीतम वडगावे, राजेंद्र बोठे, रायभान डांगे, मिनीनाथ कोते, देवानंद शेजवळ, संदीप जगताप, नामदेव सरोदे, भाऊसाहेब दिघे, प्रमोद गायके, वसंत चौधरी, सुनील लोंढे, ज्ञानदेव शिंदे, पांडुरंग धुमसे, रमेश शेलार, प्रतिभा भराड, पौर्णिमा बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ३ पॅनल कडून प्रत्येकी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने ही निवडणूक तिरंगी होणार आहे. आज ३१ जानेवारीला उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंगत येणार आहे. १६६६ सभासद संख्या असलेल्या या सोसायटी निवडणुकीसाठी ११ फेब्रुवारीला मतदान होणार असल्याने निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस बाकी राहिले असून या दहा दिवसांत ही निवडणूक रंगदार होणार असून तिन्ही पॅनलने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.