अभिनेत्री सिध्दी इदणानी साईबाबा चरणी लीन
शिर्डी प्रतिनिधी
द केरळ स्टोरी या चित्रपटातून हिंदीत पदार्पण करणारी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सिद्धी इदनानी आज शिर्डीत श्री साईबाबा चरणी लीन झाल्या.सिद्धी इदनानी ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी तमिळ आणि तेलुगु सिनेमांमध्ये दिसते. जम्बा लकिडी पंबा या तेलगू चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. वेंधु थानिधाथु काडू या तमिळ चित्रपटातील भूमिकेसाठी तिला “पावई” म्हणून समीक्षकांनी प्रशंसा केली होती.सिध्दी इदनानी
श्री साई समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. सन २०२३ हे वर्ष सिद्धीसाठी खास ठरलं आहे .या वर्षातील तिचा द केरला स्टोरी हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. यावेळी त्यांचा शाल व साई मार्गदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी निखिल रुपारेल,आशना म्हांबरे,राजदीपसिंह जाधव आदी उपस्थित होते.