शिर्डी शहरात रोडरोमिओ बाईकर्सवर कारवाई होणार का ?
शिर्डी ( प्रतिनिधी )- शिर्डी शहरात रोडरोमिओ बाईकर्स आपल्याकडील मोटारसायकलच्या इंजिन मध्ये बदल करून सायलेन्स द्वारे निर्माण होणाऱ्या मोठ्या ध्वनीमुळे लहान मुले, मुली, वयोवृद्ध तसेच विशेषतः महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर
आला आहे.या बाईकर्सवर कारवाई होणार का ? याबाबत शिर्डी शहर वाहतूक नियंत्रण शाखा व प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ ) यांच्या कारवाई संदर्भात साईभक्त व ग्रामस्थांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होय आहे.
श्री साईबाबांच्या शिर्डीत रस्त्यावर सध्या आवाज करणा-या बाईकस्वारानी धुमाकूळ घालत आहे शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळ्यातील रस्त्यांवर वाढत्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असून परिणामी सार्वजनिक शांतता अनेक ठिकाणची धोक्यात आली आहे या बाईक सरांना बोलणार तरी कोण जादा बोलेंगे तो कान काटेंगे अशी परिस्थिती असल्याने नको ती घनदाट म्हणून अनेक जण हा करणे आवाज सहन करणे पसंत करतात या विरोधात आवाज उठवणे म्हणजे पंगा घेतल्यासारखे होईल त्याचा परिवाराला त्रास नको म्हणून अनेकांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवले आहे शिर्डी शहरात
स्वतंत्र उपविभागीय पोलिस कार्यालय आहे.
डि वाय एस पी दर्जाचा अधिकारी यांसह पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक त्याचबरोबर शिर्डी शहर वाहतूक नियंत्रण शाखा आहेत.तरीही शहरातील उपनगरात अशाप्रकारे बाईकर्स, रोडरोमिओ वेगाने मोटारसायकल चालवतात.अचानकपणे शालेय विद्यार्थिनींच्या पाठीमागून वेगाने बाईक घेऊन यायचं आणी गाडी रेस करताच फटाक्यासारखा मोठा आवाज करून निघून जात असल्याचे प्रकार वाढले आहेत.याविषयीच्या तक्रारी कोणाकडे कराव्यात अशा दुविधेत येथील पालकवर्ग सापडला आहेत. यामुळे विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे शहरात शांतता बाधित होत आहे.दिवसा ढवळ्या आणी रात्री उशिरापर्यंत हे बाईकर्स शहराच्या उपनगरात फेरफटके मारून शांततेचा भंग करत असतात.तत्कालीन उपविभागीय अधिकारी सागर पाटील यांच्या कार्यकाळात माध्यमीक विद्यालय व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळ शाळा भरते वेळी आणी सुटतांना बिट मार्शल पथक तैनात असायचे मात्र तेही आता काळाच्या ओघात बंद करण्यात आले आहे.तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी दिसेनासे झाले आहे.शहरातील वाहतूक नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक आणी पोलिस कर्मचारी यांनी या बाईकस्वारांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन कायद्याचा भाग व पोलिसांचा वचक निर्माण करावा अन्यथा ही प्रवृत्ती बळावेल व शहराच्या व साई भक्तांच्या शांततेला नेहमीच बाधा पोहोचवतील यात शंका नाही