शिर्डी पोलीस स्टेशनचे सिंघम संभाजी पाटील यांची धडक कारवाईएका आरोपीस चक्क कट्यासह केले जेरबंद नूतन आलेल्या पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
शिर्डी प्रतिनिधी/
शिर्डी शहरालगत असलेल्या निमगाव कोराळे शिवारात नगर मनमाड रोड लगत एका हॉटेलच्या समोर एका तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती खबरी कडून शिर्डीला मिळतात पोलीस उपविभागीय अधिकारी,शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील पोलीस पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तेथे उभा असलेल्या एका तरुणाला मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे गावठी कट्टा किंमत 25 हजार रुपये व दोन जिवंत काडतूस मिळून आले त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव साईनाथ भाऊसाहेब जाधव उर्फ डोला वय २२राहणार निमगाव असे सांगितले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ७५/ २०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम, ३७(१) सह१३५प्रमाणे पोलीस कर्मचारी बाबासाहेब जराड यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डी हे धार्मिक क्षेत्र असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांचा वापर दिवसेंदिवस वाढत असून काही दिवसापूर्वीच शिर्डीत आलेल्या साईभक्त भाविकांवर याच परिसरात गोळीबार करून लूटमार करण्यात आली होती तसा गुन्हा देखील शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता या परिसरात नेहमीच गुन्हेगारांचा वावर असून अधून मधून या परिसरात खूप खुनाचा प्रयत्न हाणामाऱ्या लुटमार असे प्रकार घडलेले आहे निमगाव कोराळे देशमुख चारी ह्या परिसरात कायमच रात्री बेरात्री गुन्हेगारांचा वावर असतो ज्या तरुणाकडे हा गावठी कट्टा सापडला आहे तो त्याने कशासाठी आणला होता तो कुठून खरेदी केला त्याच्या सहवासात कोण आहे याचा वापर कुठे करण्यात आला आहे का?
याचा देखील शिर्डी पोलिसांकडून तपास केला जात आहे त्याच्याकडे सापडलेला गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस मिळुन आल्याने तो कोणाचा काटा काढण्याचे तयारीत होता की काय हे देखील लवकरच तपासात पुढे येणार आहे शिर्डी शहरात वाढत्या विविध व्यवसाय बघता गुन्हेगारांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून पाकीटमारी धूमस्टाईल चोऱ्या यावर अंकुश निर्माण होण्याची गरज आहे
गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहे जुने माहितीगार पोलीस कर्मचारी बदलून गेल्यामुळे गुन्हेगारांची वाढते धाडस पाहता कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने शिर्डी शहरात कोंबिंग ऑपरेशन करण्याची गरज निर्माण झालेली आहे शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर मटका अवैध दारू विक्री गांजा विक्री दुचाकी वाहनाची चोरी वेश्या व्यवसाय व त्याच्या जीवावर पैसे कमावणारे तरुण याची संख्या देखील धक्कादायक वाढ होत आहे अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यासाठी मोठी मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे शिर्डी पोलिसांच्या डिबीच्या पथकाचे होणारे, दुर्लक्ष व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचे याकडे होणारे दुर्लक्ष पाहता गुन्हेगारांची हिंमत वाढत असल्याचे या घटनेतून पुढे आले आहे असे प्रकार देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे , त्यामुळे या गंभीर वाढत्या गुन्हेगारीकडे नाशिक परिक्षेत्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे