साईभक्त महीलचे एक लाख ३०हजाराचे सोने धुमस्टाईलने पळविले पोलीस दप्तरी ४०हजाराची नोंद
शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डीत येणाऱ्या परराज्यातील महिलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने सध्या धूम स्टाईल पद्धतीने चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांच्या रडारवर असून २१ जानेवारी २०२४रोजी शिर्डी येथे कर्नाटक राज्यातील बंगलोर येथील के एस दाक्षायणी हि महिला नातेवाईकासह आली असता पिंपळवाडी रोड अयोध्या हाॅस्पिटल समोरुन पायी दर्शनासाठी कुंटबासह सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जात असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या तरुणाने माझ्या गळ्यातील २०ग्रम वजनाची बाजारभावा प्रमाणे किमत १लाख ३०हजाराची चैन धुमस्टाईनने चोरुन नेल्याची तक्रारार दिली असली तरी पोलिसाच्या २०ग्रम सोन्याच्या भावा प्रमाणे ४०हजाराचे सोने चोरुन नेल्याचा गुन्हा अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवी ३४,३९४ अन्वये दाखल करण्यात आला आहे
या बाबत संबधीत महिलेने आपले सव्वा लाख रुपयांचे सोने चोरीला गेले असताना अवघे ४०हजाराचे सोने दाखवल्याने आश्चर्य व्यक्त केले असून या बाबत आपण आपल्या मतदार संघातील खासदाराकडे तक्रार करणार असल्याचे खात्रिलायक रित्या समजते धुमस्टाईल चोरीच्या वाढत्या घटना व चोरी गेलेल्या सोन्याच्या भावात वीस वर्षांपूर्वीचा सरकारी भाव लावून चोरीचे गाभिर्य कमी करण्यासाठी शिर्डी पोलिसाची पध्दत बघता अनेकांनी संताप व्यक्त केला असून राजरोसपणे साईभक्त भाविकांना होत असलेल्या त्रासाबद्दल लवकरच काही सामाजिक कार्यकर्ते पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधणार आहे नगर येथील गुन्हे शोध पथकातील पोलीसाना जर आरोपी व मुद्देमाल पकडण्यासाठी येणारे अपयश पहाता या पथकात तात्काळ फेरबदल करण्यासाठी नाशिक येथील वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी गरज आहे