हॉटेल साईश्रद्धावर पोलीसांचा छापा हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस
शिर्डी( प्रतिनिधी): तात्कालिन उपविभागीय अधिकारी संदिप मिटके यांनी अवैध वेश्या व्यवसाय रोखण्यासाठी मोठे प्रयत्न केले काही प्रमाणात यश मिळाले तरी अजुनही शिर्डी सह उपविभागात हा व्यवसाय परराज्यातील मुली आणुन सुरू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे
बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी शिरिष वमने यांना पिंपरी निर्मळ शिवारात नगर मनमाड रोडवर हॉटेल साई श्रद्धा येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन एका पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे दोनआरोपीना ताब्यात घेण्यात आले असून आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस अमलदार संगीता नागरे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे असे असले तरी हाॅटेल व्यवसाया बरोबर काही खाजगी घराचा आसरा घेऊन देखील काही महिला चोरून लपून वेश्या व्यवसाय करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू असुन दिवसा आराम तर रात्रीच्या वेळी ग्राहक शोधण्यासाठी अशा महिला देखील नगर मनमाड रोड वरील हाॅटेल व शिर्डी शहरात फिरताना दिसतात कठोर कारवाई होत नसल्याने या महिलांना कायद्याचा फारसा धाक वाटत नसल्याने काही दलालांची मदत घेऊन व्यवसायाची घट्ट होणारी पाळेमुळे समाज व्यवस्थे पुढे ठरु बघणारे आव्हान असुन तात्कालिन जिल्हा पोलीस प्रमुख क्रृष्णप्रकाश यांनी श्रीरामपूर येस गाव अशा ठिकाणाचा वाढलेला वेश्या व्यवसाय घराच्या आतिक्रमणासह पोलीस बदोबस्तात कारवाई करुन नेस्तनाबूत केला होता मात्र त्यानंतर कोणी फारसे धाडस दाखवले नसल्याने या व्यवसाय करत असलेल्या महिला चागल्या उपनगरात देखील व्यवसाय करताना दिसुन येतात नको त्रास म्हणून सर्व सामान्य माणूस पुढे येत नसल्याने अशा महिलांची वाढती हिमत भविष्यात अवैध व्यवसाय व गुन्हेगारी साठी पोषक ठरणारी बाब भविष्यात शिर्डी उपविभागीय कार्य श्रेत्रात पोलीसांना डोकेदुखी ठरणारी बाब ठरणार आहे आजच्या कारवाई पोलीस अधीक्षक,राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली डि वाय एस पी शिरीष वमने , सपोनि कैलास वाघ, इरफान शेख, अशोक शिंदे, असीर सय्यद श्याम जाधव,संगीता नागरे निलेश सातपुते चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे शिवाजी नर्हे यांनी कारवाईत भाग घेतला आहे.