साईबाबा के नगरीने देर है अंधेर नही शेवटी नीचप्रवृत्तीच्या काक्या डोईफळे वर बाबांचा दांड्या फिरालाच चक्क पाच लाख रुपये लाच घेतांना केली अटक
आधी शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलेले व त्यानंतर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पालिकेचा पदभार घेतलेले व स्वतःला अतिक्षय कर्तव्यदक्ष म्हणवून घेणारे अहमदपूरचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आणि त्याच्यासोबत असलेले नगररचनाकार अजय कस्तुरे या दोन अधिकाऱ्यांना तब्बल 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडल्याने अहमदपूर सह शिर्डीत देखील मोठी खळबळ उडाली आहे.
या दाेघांवर अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत त्यांच्या मौजे मरशिवणी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील सर्वे नंबर 56 मधील 3600 चौरस मीटर क्षेत्रास वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झालेली असून त्यामध्ये अंतिम परवानगी मिळण्याकरिता अहमदपूर नगरपरिषद येथे दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये तक्रारदार यांनी ऑनलाइन चलान भरणा केलेला होता परंतु त्याचे काम होत नव्हते यामुळे तक्रारदाराचे व्यावसायिक नुकसान होत होते हे टाळण्यासाठी 5 फेब्रुवारी रोजी अहमदपूर नगरपरिषद मध्ये गेला होता त्यावेळी नगररचनाकार अजय कस्तुरे याने स्वतःसह मुख्याधिकारी काकासाहेब सिद्धेश्वर डोईफोडे यांच्यासाठी चक्क 7 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली असता तडजोडी अंती 5 लाख रुपये देण्याचे ठरले
त्यानुसार 14 फेब्रुवारी रोजी तक्रारदार हा नगरपरिषद परिसरात गेला असता तक्रारदाराच्या कार मध्ये नगररचनाकार अजय कस्तुरे याने पाच लाख रुपयांची लाच स्वीकारली याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारताना अजय कस्तुरे यास रंगेहाथ पकडले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही अधिकारी यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले असून या प्रकरणी अहमदपूरचे मुख्याधिकारी काकासाहेब सिध्देश्वर डोईफोडे (वय 39), नगर रचनाकार अजय विजयकुमार कस्तुरे (वय 55) यांच्यावर अहमदपूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
स्वतःला कर्तव्यदक्ष म्हणवून घेणारे मुख्याधिकारी काकासाहेब सिद्धेश्वर डोईफोडे यांनी शिर्डीत असताना देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार केल्याची चर्चा होती तसेच अनेक अनधिकृत कामांना अभय देत मोठी आर्थिक माया या माध्यमातून त्यांनी गोळा केल्याची चर्चा होती त्यानुसार त्यांच्या विरोधात दैनिक साई दर्शन चे संपादक जितेश लोकचंदानी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सापळा रचून सदर अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडण्याबाबत व त्यांच्या चल अचल संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती मात्र राजाश्रयाच्या जोरावर मुजोर झालेल्या अधिकाऱ्यांना यातून अभय मिळाले त्यानंतर जितेश लोकचंदानी यांनी राहता न्यायालयात याबाबत प्रकरण दाखल केले असून विविध भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करत गुन्हा दाखल व्हावा अशी माननीय न्यायालयाकडे विनंती देखील केली आहे लवकरच त्यावर देखील न्यायालय निर्णय देईलच मात्र बाबांच्या नगरीत सेवेची संधी मिळाली असताना सेवेऐवजी गोरगरीब नागरिकांना वेठीस धरून मेवा खाणाऱ्या अधिकाऱ्यास चांगलीच शिक्षा बाबांनी दिली असून भगवान के घर देर है अंधेर नही याचा प्रत्यय आलाय शिर्डीत कार्यरत असताना देखील मुख्याधिकारी डोईफोडे यांनी अनेक अनधिकृत बांधकामांना परवानगी दिली असल्याची आता कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा होत असून ज्या अधिकाऱ्यांसाठी आपण मोर्चा काढला त्याचेच हात भ्रष्टाचाराने बरबटले असल्याने शिर्डी नगरपरिषद मधील अनेक प्रामाणिक कर्मचारी वर्गात देखील संताप व्यक्त होत आहे