चहा व सिगारेटचे पैशे मागितले म्हणून चाकू हल्ला करणाऱ्या लक्ष्मीकांत शेजवळ याच्यावर गुन्हा दाखल
शिर्डी प्रतिनिधी /
शिर्डी शहरात शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या काकड आरती पूर्वी पहाटे ४ वाजेच्या सुमारास चहाचे पैसे मागतो का म्हणून एका चहा विक्रेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला हल्ला करण्यात आला होता साईबाबा मंदिराच्या समोरच गेट नंबर एक नगर मनमाड रोड लगत घटना घडल्याने शिर्डीत खळबळ उडाली आहे तर काही वेळ साईभक्त देखील भयभीत झाले होते
बाळासाहेब मोकाटे या जखमी तरुणास साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रक्रृत्ती गंभीर असल्याने नगर येथे उपचारासाठी दाखल केले आहे अन्नासाहैब मोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि
माझा भाऊ बाळासाहेब मोकाटे यास काही तरुणांनी चहा पिऊन सिगारेट मागितली व त्या चहा सिगारेटचे पैसे मागितल्याचा राग येऊन तरुणांनी थेट चाकू हल्ला करत कानावर,हातावर व इतर ठिकाणी वार करत गंभीर जखमी केले भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला… हल्ला करणारे पसार झाले असून त्यातील एक हल्लेखोराला मार लागल्याने त्याला सुपर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर तरुण इर्टिगा वाहनातून आले होते व या वाहनात बियर व दारूच्या बाटल्या सुद्धा मिळून आल्या आहेत सदर वाहन शिर्डी पोलिस स्टेशनने जप्त केले आहे आरोपी लक्ष्मीकांत देवानंद शेजवळ ह्याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर ८८/२०२४ भादवी
३०७ ५०४ ,५०६ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे या तरुणावर या अगोदर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत .शिर्डी शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी,छोट्या छोट्या कारणांवरून थेट होणारे चाकू हल्ले,तरुणांमध्ये वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती पाहता पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची गरज आहे