भारतातील प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी यांच्यासोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या शिर्डीतील “थावानी” वर गुन्हा दाखल
शिर्डी प्रतिनिधी/
प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी यांच्या सोबत घडलेला प्रसंग ऐकून
तुम्हाला हे आश्चर्य वाटेल की मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी सोबत विनयभंगाची घटना लखनौमध्ये घडली आहे, ती तिच्या प्रवचनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
इतकंच नाही तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी देखील मोठे योगदान आहे भर व्यासपीठावर जया किशोरी यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं.
ऊस संस्थेत महिला व बाल संरक्षण संस्थेच्या (1098) कार्यक्रमाला जया किशोरी पोहोचल्या होत्या, त्यावेळी दीपेश ठाकूरदास थावानी या नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील व्यक्तीने बळजबरीने मंचावर घुसून जया किशोरी यांच्याशी अशोभनीय शेरेबाजी केली व गैरवर्तन प्रसंगी जया किशोरीला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, जया किशोरीचा भाऊ दीपक ओझा याच्या तक्रारीवरून लखनऊ येथील हजरतगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शिर्डीत राहाणारा आरोपी दीपेश ठाकूरदास थावानी याला अटक करून तुरुंगात गजाआड करण्यात आले असून
थावाणी याच्या विरोधात हजरतगंज पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआर मध्ये म्हटले आहे की हा थावानी अनेक दिवसापासून जया किशोरीचा मागावर होता आणि त्या कार्यक्रमात त्याने स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील शेरेबाजी केली आणि जया किशोरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.वास्तविक दीपेश ठाकूरदास थावानी हा महाराष्ट्रातील शिर्डी येथील रहिवासी असून त्याचे शिर्डीत हॉटेल आहे. हॉटेल व्यावसायिक दीपेश थावानी यांचे कुटुंबीय काही शिर्डीत वास्तव्यात आहेत आणि काही आफ्रिकेत व्यवसाय करतात आणि हा थावानी कायम परदेशातही फिरत असतो.हजरतगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपेश सध्या बीकॉमच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असून तो मॉडेलिंग आणि अभिनय करतो. तो एका जाहिरातीतही दिसला आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी दीपेश जया किशोरीला सोशल मीडियावर फॉलो करतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला निवेदकाच्या कार्यक्रमांची माहिती मिळते. लखनौच्या कार्यक्रमाचीही माहिती त्यांनी याच पद्धतीने जाणून घेतली होती
थावानी बराच दिवसापासून किशोरीचा पाठलाग करत होता तो जया किशोरीच्या मागे हैदराबाद, जयपूर, जालंधर येथे कार्यक्रमांमध्ये दीपेशही अशाच टप्प्यांवर पोहोचला आहे. दीपेशवर इतर शहरातही गुन्हे दाखल आहेत जया किशोरीची कथा सांगण्याची शैली सर्व वयोगटातील लोकांना आवडते. २८ वर्षीय जया किशोरी हिचा राजस्थानच्या सुजानगढ गावात एका गौर ब्राह्मण कुटुंबात जनम झाला. श्रीकृष्णावरील भक्ती श्रद्धा यामुळे तिला किशोरी ही पदवी देण्यात आली आहे. किर्तनकार महिलेला त्रास झाल्याने देशभरात या घटनेचा व आरोपीचा निषेध केला जात असून आरोपी व आरोपीस पाठबळ देण्याचा व तक्रारदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असून आरोपीला मदत करणाऱ्यांची देखील चौकशी केली जाण्याची गरज आहे