शिर्डी ( प्रतिनिधी )- शिवसेना पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा प्रमुख पदी कमलाकर कोते यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा नव्याने जिल्हाप्रमुख पदी फेर निवड करण्यात आली असून त्यांच्याकडे उत्तर नगर जिल्ह्यातील राहता संगमनेर अकोला या तालुक्यात बरोबरच राहुरी तालुक्यातील ३२ गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्ती बद्दल पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान सहकार तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या उत्तर नगर जिल्ह्यातील कार्यकारणीत काही नव्याने फेरबदल करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांबरोबरच धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाजकार्याचा वसा पुढे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू खंदे समर्थक कमलाकर कोते यांना पुन्हा जिल्हाप्रमुख पदाची संधी देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे राहता संगमनेर अकोला या तीन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली होती मात्र त्यांच्या कार्याची दखल घेत अधिकच्या राहुरी तालुक्यातील ३२ गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.कोते यांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर संपर्क असल्याने तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी मोठी मदत झाली असून त्यांच्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यांच्याशी योग्य ताळमेळ ठेवला आहे. तसेच महायुतीतील कोपरगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ किरण लहामटे, माजी आमदार भानुदास मुरकुटे आदी नेत्यांबरोबर सातत्याने समन्वयाची भूमिका घेऊन विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली असून पक्ष संघटना मजबूत आणी वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.याच कामाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन श्री कोते यांच्यावर पुन्हा जिल्हाप्रमुखांची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीनंतर
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिकांनी अभिनंदनाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत.