अपंग साईभक्ताचे पाकीट मारले , मदतीला शिर्डीकर धावले
अपंग साईभक्ताचे पाकीट मारले , मदतीला शिर्डीकर धावले
शिर्डी शहरात काही विकृत महाभागांकडून येणाऱ्या भाविकांची फसवणूक होणे लूट होणे काही वेगळे नाही.माञ यात चक्क ग्वाल्हीयर येथील अपंग साईभक्त भगवान सिंग हे शिर्डीत साईदर्शनासाठी आल्यानंतर त्यांचे दर्शन झाल्यानंतर कोणी अज्ञात व्यक्तीने पैशाचे पाकीट मारले.यात त्यांची रोख रक्कम असल्याचे सिंग यांनी सांगितले आहे. या घटनेवरुन आता शिर्डी शहरात अपंग व्यक्तीलाही काही महाभाग लक्ष करत असल्याने गुन्हेगारीचा हा कळसच झाल्याची भावना मदत करण्यासाठी पुढे गेलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ग्वाल्हीयर येथील भाविक भगवान सिंग हा दोन्ही पायाने अपंग असलेला साईभक्त हा मोठ्या श्रद्धेने शिर्डीत साईदर्शनासाठी आला माञ या अपंग साईभक्ताचे पाकीट मारुन त्यालाही लक्ष केले असल्याने पुन्हा एकदा शिर्डी शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या साईभक्ता बरोबर घडलेला प्रकार पाहून मग नेहमीप्रमाणेच शिर्डीतील काही तरुणांनी या अपंग साईभक्ताला यथोचित मदत करुन त्याचा परतीचा मार्ग मोकळा करुन आपले कर्तव्य पार पाडले आहे.
साई अमृत कॉम्प्लेक्स समोर निरागस अंतकरणाने बसलेल्या या अपंग व्यक्तीला
दीपक आयर ,संतोष नागपुरे,
अनिस पठाण ,प्रवीण कटारनवरे,प्रकाश गोंदकर यांनी मदतीचा हात पुढे करत संकटात सापडलेल्या या साईभक्ताला दिलासा दिला आहे.यावेळी या भाविकाने जर आपल्या सारख्या अपंग व्यक्तीची अशी लूट होते तर इतर भाविकांचे काय ? असा प्रश्न उपस्थित करत शिर्डी शहरात साईभक्तांची सेवा करणाऱ्या शिर्डीकरांचे कौतुक करत केलेल्या आर्थिक मदतीसाठी आभार व्यक्त केले आहे.तर सामाजिक कार्येकर्ते प्रकाश गोंदकर यांनी हा प्रकार पाहून मोठ्या वेदना झाल्या व डोळ्यात अश्रू आले असुन अडचणीत असलेल्या साईभक्तांची सेवा करणे आपले कर्तव्यच असुन अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन व साई संस्थानने ठोस पाऊल उचलून अशा महाभागावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे