सदाशिव लोखंडे यांच्याविषयी नाराजीचे वातावरण ,स्थानिक उमेदवार देण्याची नागरिकांची मागणी
सदाशिव लोखंडे यांच्याविषयी नाराजीचे वातावरण ,स्थानिक उमेदवार देण्याची नागरिकांची मागणी
शिर्डीत गेल्या तीन निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी एक तरी उमेदवार हा मतदारसंघाच्या बाहेरचा राहिलाय विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे देखील मतदार संघाच्या बाहेरचे आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक नशीबवान नेता कोण असेल तर सदाशिव लोखंडे असच म्हटलं जातं कारण 1995 ते 2009 सलग तीन वेळा आरक्षित असलेल्या कर्जत जामखेड मधून भाजपचे आमदार 2009 मध्ये मुंबईत कुर्ल्यातून मनसेचे उमेदवार 2014 मध्ये ऐनवेळी शिवसेनेचे आरक्षित असलेल्या शिर्डीतून लोकसभेचे उमेदवार आणि सलग दोन वेळा खासदार म्हणून नगर जिल्ह्यातले पण आयुष्य त्यांचं मुंबईत गेलं पण पक्षाच्या बळावर आणि योग्य टायमिंग सादत ते आमदार झाले खासदारही झाले 2014 मध्ये तर शिवसेनेने बबनराव घोलप यांना उमेदवारी दिली होती पण ऐनवेळी त्यांना एका प्रकरणात तीन वर्षाचे शिक्षा झाल्यामुळे घोलप यांना लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती आणि लॉटरी लागली की सदाशिव लोखंडे यांची पण यावेळी मात्र मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांच्या विषयी प्रचंड नाराजी आहे आणि शिंदेच्या मोजक्या खासदारांचा तिकीट जर कापलं गेलं तर त्यात लोखंडेंचे देखील नाव असेल असं देखील बोलले जाते आणि त्याचाच फायदा घेत भाजप डाव टाकण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे यावेळी तरी स्थानिक विरुद्ध स्थानिक अशी लढत लोकसभेत व्हावी अशीच मतदारांची इच्छा आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून 2009 पासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलाय आणि शिवसेनेची विशेष ताकद नसताना इथे शिवसेनेचाच खासदार निवडून देखील अनेकांना विशेष वाटते यावेळी मात्र परिस्थिती बदललेली आहे गेली दहा वर्षे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडेंवर मतदार नाराज असल्याचे चित्र आहे लोखंडेंचा मतदारसंघात संपर्क किती हाच मोठा प्रश्न आहे लोखंडे मतदार संघात दिसतच नाही अशीच तक्रार शिर्डीकरांची आहे त्यामुळे खासदार याच मतदारसंघातील असावा असा सूर शिर्डीकरांनी धरलाय शिर्डी मतदारसंघात सगळाच बागायती पट्टा येतो. तीन मोठे धरण मुबलक पाठ पाणी सदन शेतकरी मोठी देवस्थान पर्यटन स्थळ असा हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ प्रत्येक तालुक्यात दोन दोन साखर कारखाने संस्थानिक असलेले मातब्बर नेते आणि सहकाराचे विस्तारलेलं जाळ यामुळेच इथे नेत्यांचा मतदारांशी असलेला संबंध तसा थेट असतो त्यामुळे पक्षापेक्षा नेत्यांचा प्रभाव या मतदारसंघात जास्त आहे त्यामुळे जो स्थानिक गणितं जुळवतो तो खासदार होतो असे इथले गणित मात्र लोकसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे तालुक्यातील प्रस्थापित नेते मंडळी खासदारकीच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष देत नाही किंवा विशेष ताकद लावताना दिसत नाहीत मात्र यावेळी ताकद लावली जाऊ शकते कारण लोखंडे नियोजन आराधीचा आणि शिवसेनेकडे पर्यायी उमेदवार नसल्याचा फायदा भाजपकडून घेतला जाऊ शकतो भाजपकडून या जागेवर तसा आवाज केला जातोय केवळ दावा नाही तर प्रयत्न देखील सुरू असल्याचं बोललं जाते 2009 मध्ये आघाडीची जागा रामदास आठवलेंना सोडण्यात आली होती रामदास आठवले स्वतः मैदानात उतरले दुसरीकडे तेव्हा काँग्रेसमध्ये असलेले राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांची ताकद होती शिवाय तेव्हा राष्ट्रवादीचे देखील ताकद इथे होते हे सर्व पाहता रामदास आठवले तेव्हा सहज निवडून येतील असं बोललं गेलं पण ऐनवेळी शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे भाऊसाहेब वाकचौरे खासदार झाले विखेंनी चक्र फिरवली आणि हे सगळं घडलं असंच तेव्हा बोललं गेलं वाकचौरे हे विखेंच्या जवळचे मानले जात होते 2014 मध्ये ऐनवेळी वाकचौरे विखेंकडे गेले काँग्रेसकडून त्यांनी तिकीट घेतलं शिवसेनेने बबनराव घोलप यांना उमेदवारी दिली नंतर त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्यामुळे सदाशिव लोखंडे यांची लॉटरी लागली आणि मोदी लाटेत ते निवडून देखील आहे 2019 मध्ये पुन्हा सदाशिव लोखंडे शिवसेनेकडून आणि श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे हे काँग्रेसकडून मैदानात उतरले होते तिथे देखील लोखंडे जिंकले त्यामुळे 2009 पर्यंत विखेंमुळे जिथे काँग्रेसचे वर्चस्व होतं तिथे गेली 15 वर्ष शिवसेनेचा खासदार आहे आता विखेंना तिथे पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करायचंय आणि भाजपचा खासदार निवडून आणायचा आहे शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंचे नेते विद्यमान खासदार असलेल्या जागा पुन्हा मागतात त्यामुळे पुन्हा शिर्डीची जागा शिवसेनेकडे गेली तर सदाशिव लोखंडे हे पुन्हा उमेदवार असण्याचे दाट शक्यता आहे किंवा नाराजी पाहता शिंदे नवा चेहरा देऊ शकतात असे देखील बोलले जाते उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत असल्याचे देखील बोलले जाते पण भाजप मात्र या मतदारसंघात असलेली ताकद दाखवत ही जागा स्वतःकडे घेण्यास आग्रही आहे स्वतः विखे यासाठी प्रयत्न करत आहेत असं त्यात राधाकृष्ण विखेंचे जवळचे मानले जाणारे नितीन दिनकर यांची संघटनेत चांगली ओळख आहे शिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेली अनेक वर्ष ते भाजपच्या पक्ष संघटनेत काम करतायेत संघटन बांधणीचे ते काम करतात तेव्हा भाजपकडे ही जागा आल्यास नितीन दिनकर हे नाव तिथे आघाडीवर आहे