डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन,
अहमदनगर, दि.१२ मार्च २०२४:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी त्यांनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.
यावेळी तहसिलदार डॉ संजय बिरादार ,देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर,यांनी डॉ नीलम गो-हे यांचे स्वागत केले. यावेळी संस्थांचे कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले, उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, पोलिस पाटील, सयराम बानकर, आदी उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात अभिषेकही केला. श्री शनैश्वर मंदीर दर्शन झाल्यानंतर त्यांनी प्रसादालयात प्रसादाचे सेवनही केले.