मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
मराठा समाज प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे करणार आहे. मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांना याचा फटका बसू शकतो.
धाराशिवमधी लोकसभेची निवडणूक प्रशासनासाठीच आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. प्रत्येक गावातून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आलीये. या उमेदवारांच्या अनामत रकमेसाठी प्रत्येक मराठा कुटुंबाकडून 100 रुपये देणगी दिली जाणार आहे. आतापर्यंत 50 जणांची उमेदवारी निश्चितही करण्यात आलीय.
दरम्यान याबाबत 24 मार्चला अंतरवाली सराटीत बैठक होईल. त्यात उमेदवारांबाबत पुढील दिशा ठरवली जाईल. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.