शिर्डी गोळीबार प्रकरणी दोघा संशयितांना पोलीसांनी घेतले ताब्यात
शिर्डी, (प्रतिनिधी)
शहरात गुरुवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भरवस्तीत साईलक्ष्मी पार्किंग मध्ये गोळीबाराची घटना घडली होती शिर्डीमध्ये गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे काही दिवसांपूर्वी शिर्डी ग्रामस्थांनी अवैध धंदे व गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती त्यामुळे हे प्रकरण पोलीसांनी गंभीरपणे घेतले होते परंतू काही दिवसांनी जैसे थे परिस्तिथी आहे
फिर्यादी साईनाथ रवींद्र पवार (वय २२रा शिंगवे ता राहता ) यांने दिलेल्या फिर्यादीत मी व माझा भाऊ सचिन पवार व दत्तात्रय पवार चार चाकी वाहन पार्कींग मध्ये लावत चहाच्या दुकानात चहा पिऊन चर्चा करत असताना संपत शंकर वायकर व त्याचा अज्ञात साथिदार गावठी कट्टा काढून साईनाथ पवार यास म्हणाला तुला एकदाचा संपवून टाकतो असे म्हणत जीवे मारण्यासाठी गोळीबार केला एक गोळी चुकवली व दुसरी फायर झाली नाही
अशी फिर्याद शिर्डी पोलीसात दिल्यामुळे शिर्डी पोलीसांनी आरोपी संपत शंकर वायकर व अज्ञात साथीदार याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १९०/२०२४भादवी कलम ३०७,३४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ मुबई पोलीस कायदा कलम ३७(१) (३) १३५ सह कायदा १९३२ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी उपविभागीय अधिकारी शिवपुजे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट दिली आधिक तपास सपोनि सागर काळे हे करीत आहे पोलीसांनी काडतुस व लाकडी दाडके जप्त केले आहे
हया गुन्ह्यातील आरोपी यांनी राहाता पोलीस स्टेशनला परस्पर टोळीतील विरोधात फिर्याद दिली आहे घटनेतील दोघा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे