मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा
वणी-आर्णीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हात बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवारला (८ एप्रिल २०२४) चंद्रपूर येथे येणार आहेत.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपुरात होणार आहे.
मोरवा विमानतळा जवळील भव्य पटांगणावर सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजता ही सभा होईल. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
विकास कामे आणि चंद्रपूरच्या विविध घटकांच्या प्रगतीच्या दृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यात मुनगंटीवार यांना यश आले आहे. अशात देशातील गोरगरीब, शेतकरी, मजूर, महिला व तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून ‘मोदी की गॅरंटी’ देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन होत असल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.