भिक्षेकरी धरपकड मोहीम भिक्षेकरी अन् मध्यपींची उडाली धांदल
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने येथे लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात तसेच भाविक त्यांच्या श्रद्धेनुसार दान धर्म देखील करत असतात मात्र भाविकांच्या भावनेचा गैर फायदा घेत काही धडधाकट तर काही मध्यधुंद चित्र विचित्र कपडे घातलेले भिक्षेकरी भाविकांना त्रास देत थेट त्यांचा पाठलाग देखील करत त्यांच्या मागे मागे हॉटेल पर्यंत जाण्याची मजल मारतात त्यामुळे भाविकांना कधी कधी मंदिर परिसरात फिरणे नको नकोसे होऊन जाते
भाविकांना त्रास देणाऱ्या तसेच नशेच्या अवस्थेत शहरात कुठेही जागा मिळेल तिथे बस्तान मांडलेल्या भिक्षेकरुंना… काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रामनवमी उत्सवाच्या अनुषंगाने भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आज श्री साईबाबा संस्थान सुरक्षा विभाग,
शिर्डी पोलिस स्टेशन तसेच शिर्डी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भिक्षेकरू हटाव मोहीम राबवत जवळपास 100 च्या आसपास महिला व पुरुष भिक्षेकरुंना साईबाबा संस्थानच्या बस मध्ये बसवून शिर्डी पोलिस स्टेशन येथे आणले असून त्यांची मेडिकल तपासणी करून त्यातील 59 पुरुष भिक्षेकरी यांना श्रीगोंदा येथे तर 27 महिला भिक्षेकरी यांना चेंबूर येथील भिक्षेकरी सुधार केंद्रावर नेऊन त्यांचे पुनर्वसन करत चांगले आयुष्य जगण्याचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तसेच ही मोहीम अशीच यापुढील काळात सुरू ठेवणार असल्याचे शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व साईबाबा संस्थान सुरक्षा विभागाचे अधिकारी रोहिदास माळी यांनी सांगितले
आजची मोहीम ही अतिशय मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली असून याआधी फक्त मंदिर परिसरात राबविली जात होती मात्र आज संपूर्ण शिर्डी शहरात पोलिस अधिकारी,मंदिर सुरक्षा अधिकारी यांनी स्वतः पायी फिरत भिक्षेकरी शोधून शोधून पकडल्याने नागरिकांनी देखील या कारवाईचे स्वागत केले आहे.
काही वेळा भिक्षेकरी आणि मोहिमेतील कर्मचारी यांची तू तू मैं मैं देखील पहावयास मिळाली तर शिर्डी पोलिस स्टेशन येथे या सर्वांना आणले असता एकापेक्षा एक नमुने या भिक्षेकरी पुरुषांमध्ये पहावयास मिळाले …पकडून आणलेले सर्वजण चिंताग्रस्त असताना त्यातील एक पुरुष आणि एक महिला यांनी आपल्या पिशव्यातील सोबत असलेला डब्बा उघडून थेट जेवण करण्यास सुरुवात केल्याने उपस्थितांना… “हम हमारे.. मुड मे” ..चा प्रत्यय आला तर काहींनी पत्रकारांना थेट सेल्फी साठी देतात तशी पोज देत सर्व काही आलबेल असल्यासारखा आव आणला.
मात्र साई मंदिर परिसर,पिंपळवाडी रोड,हॉटेल सन अँड सन रोड, साईश चौक,संस्थान पार्किंग,वराह चौक, कोते गल्ली,भाजी मंडई,मशिद समोरील रोड, सेवाधाम इमारत रोड,नगरपरिषद समोरील फुटपाथ,हायस्कूल शाळा,200 रूम गार्डन जवळील भिंत,अश्या विविध ठिकाणी अतिशय धडाकेबाज कारवाई करत मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत आहे