Blog
क्युआर कोड स्वरूपात सेल्फी पॉइंट हा उपक्रम जिल्हाभरामध्ये राबवला जाणार
अहमदनगर के मतदार,आमचं अहमदनगर भारी .. आमचं मत भारी ..१३ मे ला आमचं मतदान पण भारी ” अशा आकर्षक घोषवाक्यांनी मतदारांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले.एकी नावाची मुंगी,तसेच १३ मे या शब्दांच्या विशिष्ट आकारातील सेल्फी पॉईंट्स अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.
जाहिरात
आपले नाव मतदार यादीत शोधा ,आपले मतदान केंद्र शोधा ,अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचे उपक्रम पहा व आपले सेल्फी फोटो व्हाट्सअप क्रमांकावर अपलोड करा अशा चार प्रकारच्या संकल्पनांचे चार क्यु आर कोड तसेच भारत निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या चार ॲप ची माहिती देखील क्युआर कोड स्वरूपात सेल्फी पॉइंट वर देण्यात आली होती.
हा उपक्रम जिल्हाभरामध्ये राबवला जाणार आहे.
उपक्रमासाठी अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी),मीना शिवगुंडे(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),प्रदीप पाटील(तहसीलदार-निवडणूक),बाळासाहेब बुगे(उपशिक्षणाधिकारी), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार) , डॉ.अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत)व सर्व स्वीप समिती सदस्य आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.