साईबाबा संस्थानच्या महिला सुरक्षा रक्षकांना सापडलेले सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे परत दिल्याने सर्वत्र कौतुक
मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून आजच्या दिवशी सोने खरेदी करायची परंपरा आहे. आज सोन्याचे भाव 73000/- रु प्रति तोळा झालेत. नेहमीप्रमाणे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट,
शिर्डी चे महाराष्ट्र सुरक्षा बल चे महिला सुरक्षा रक्षक श्रीमती स्वाती मुरकुटे या सहा नंबर गेट वर ड्युटी वर असताना त्यांना सुमारे तीन ग्राम वजनाचे ( आजच्या बाजार भावाप्रमाणे 21000/- रु किमतीचे ) कानातील दागिना सापडला. तो दागिना त्यांनी संरक्षण कार्यालयात प्रामाणिक पने जमा केला.
दागिना हरविलेचे तक्रार एका मराठी दाम्पत्य कडून मिळाल्यानंतर तो सोन्याचा दागिना ओळख पटवून परत केला. ज्यांचा दागिना हरविला ते शेतकरी, ज्यांना दागिना सापडला ती शेतकऱयांची मुलगी. गुढी पाडावाच्या दिवशी दर्शनाला मंदिरात आलो आणि दागिना हरविला म्हणून त्या ताईला प्रचंड दुःख झाले.
परंतु योगायोग एका महिला सुरक्षा कर्मचारी यांना सापडला आणि तो परत दिला त्यावेळी त्यांना अत्यानंद झाला. गुढी पाडव्याला मला बाबांनी सोने दिले असे उद्गार त्या महिलेने काढले.
यापेक्षा काय कामाची पोचपावती हवी.महिला सुरक्षा रक्षक स्वाती मुरकुटे यांच्या या चांगल्या कामाबद्दल श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम हुलवले यांनी शाबासकी दिली. सदर प्रामाणिक महिला कर्मचारी श्रीमती स्वाती मुरकुटे यांना संरक्षण ऑफिस ला बोलावून घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.