श्री रामनवमी उत्सवाला साईभक्त भाविकाची मोठी गर्दी
शिर्डी प्रतिनिधी/ श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डी येथे अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी वीणा व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप कार्यकारी अभियंता दिनकर देसाई यांनी फोटो घेवून सहभाग घेत मिरवणूकीत सहभागी झाले होते
. यावेळी ग्रामस्थ संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त सहभागी झाले होते.श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांची सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली. द्वारकामाईतील बदलण्यात येणा-या गव्हाच्या पोत्याची श्री साईबाबा समाधी मंदिरात विधीवत पुजन करुन गव्हाचे पोते बदलण्यात आले. रामनवमी उत्सवा निमित्त मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर सकाळी १० ते १२ यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्रीराम जन्मोत्सव कीर्तन कार्यक्रम झाला. शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.भगवान प्रभुरामचंद्र यांचा जन्मदिवस अर्थात रामनवमी , संपूर्ण देशभरात हा सोहळा साजरा होत असताना साईंच्या शिर्डीतही हा जन्मोस्तवाचा सोहळ्याची सुरुवात पहाटे कावडीने आणलेल्या गंगाजलाने बाबांच्या मंगलस्नानाने झाली व नंतर काकड आरतीने उस्तावाच्या मुख्य दिवसाचा प्रारंभ झाला.
दुपारी बारा वाजता भक्तीमय वातावरणात , प्रभू रामचंद्रांची मूर्ती चांदीच्या पाळण्यात ठेऊन विधिवत पूजा आणि मंत्रोच्चरात प्रभुरामचंद्रांचा हा सोहळा साई संस्थांनचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, जिल्हाधिकारी सलिमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत आरती करून पार पडला. तीन दिवस चालणाऱ्या या उस्तवाचा मुख्य दिवस असल्याने भाविकांना दर्शन सुलभतेने व्हावे याकरिता साई समाधी मंदिर रात्रभर खुले होते, राज्यभरातून शेकडो पालख्या दाखल झाल्या होत्या त्यामध्ये अनेक महिला, वयोवृध्द नागरिक, मुले, मुली पायी चालत येणारे असे हजारो भाविक साईबाबांच्या नावाने घोषणा देत मंदिर परिसरात दाखल झाले होते त्यामुळे शिर्डीतील भगवे वादळ आणि साई नामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली होती . ४१ डिग्री सेल्सिअस तापमानाच्या कडक उन्हात हजारो भाविक रस्त्यावरून पायी चालत होते तर त्यांच्या सेवेसाठी शिर्डी ग्रामस्थ एकवटले होते तर त्यांनी अनेक ठिकाणी पाण्याची, नास्त्याची, जेवणाची व्यवस्था केली होती. आज बाबा आपल्या नगरीत आले अशी श्रद्धा मनी बाळगून शिर्डीतील घराघरांतून प्रत्येकी आकरा दशम्या एकत्र करून भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात आल्या. साई संस्थानच्या प्रसदलयात एक लाख भाविकांना पुरेल असा मिष्ठान्नरुपी प्रसाद तयार करण्यात आला होता याचा अनेक भाविकांनी तसेच पंचक्रोशीतील भक्तांनी लाभ घेतला. संस्थानचे बुंदी प्रसाद लाडू काऊंटर ही वाढविण्यात आले होते तर रेल्वे स्टेशन, मंदिर परिसर, भक्तनिवास, प्रसादालय याठिकाणी येणाऱ्या भाविकांना लाडू प्रसाद सहज उपलब्ध होईल याची काळजी घेण्यात आली होती.
साई संस्थान प्रशासन, पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन यांनी चोख नियोजन केले होते भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून अँब्युलन्स सह डॉक्टरांच्या अनेक टीमही तैनात होत्या.
दुर्दैवाने पाथरे येथून पायी चालत आलेल्या पालखीमध्ये सावळीविहीर येथे एक मोटरसायल स्वर भरघाव वेगाने घुसून झालेल्या अपघातात एक महिला साईभक्त ठार झाली तर जखमी झालेल्या भाविकांवर साई संस्थान हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचार व्यवस्था करण्यात आली होती.
बुधवारी संध्याकाळी बाबांचा सुवर्ण रथाची मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये मुंबई येथील सुप्रसिद्ध वंदन ढोल ताशा पथक, लेझिम पथक, अनेक नामांकित बँड पथक, शिर्डीतील क्रांती युवक मंडळाचे ढोल ताशा पथक, अनेक पारंपारीक वाद्यांच्या गजरात शिर्डी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती.
चौकट – हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असणाऱ्या साईंच्या शिर्डीत दुपारी शेकडो मुस्लिम बांधव व हिंदू बांधव एकत्र येऊन संदल ची मिरवणूक काढून द्वारकामाई मंदिरात बाबांना चंदनाच्या अष्ठ गंधाचा तिलक लाऊन पूजा आरती करून दुवा मागण्यात आली .
रूढी परंपरेनुसार द्वारकामाई मंदिरातील नवीन गव्हाच्या पोत्याची पूजा संस्थान पदाधिकाऱ्यांनी केली.
आज रामनवमी उस्तावाचा तिसरा दिवस असून दुपारी काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडी फोडून आरती झाल्यावर कार्यक्रमाची सांगता होणार आहे .