शिर्डी प्रतिनिधी/ सगळीकडे निवडणुकीचे वातावरण व रणधुमाळी सुरू असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघात मात्र जनता व कार्यकर्ते याचा फारसा सहभाग दिसत नसुन ठराविक कार्यकर्ते फक्त उमेदवारांच्या मागे फिरताना दिसत असुन जुन्या भाजपा कार्यकर्ते व शिवसेनेचे जुने कार्यकर्ते देखील प्रचारत दिसत नसल्याने उमेदवारांची नाराजी काढण्यासाठी दमछाक होत असुन माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी देखील खा सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी सहभाग न घेतल्याने खा लोखंडे याची चिंता वाढवणारी ठरत नुकताच प्रचार कार्यालयाचे शिर्डी येथे उद्घाटन झाले
मात्र अनेक नेत्यांची अनुपस्थिती बघता अजुन म्हणावे असे वातावरण आज तरी दिसत नाही खा लोखंडे व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे या दोन्ही उमेदवारांनी बेरोजगारी पाणी प्रश्न शेतकऱ्यांच्या विविध अडचणी शाश्वत नसलेला रोजगार भविष्यात कोणते काम करणार या संदर्भात अजुन भाष्य केलेले दिसत नाही
खा वाकचौरे यांनी वैयक्तिक भेटीगाटीवर मोठा भर दिला असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गावे पिजुन काढली आहे तर खा लोखंडे देखील प्रचारासाठी मतदार संघात फिरताना दिसत असले तरी मतदारांमध्ये मात्र फारसा उत्साह दिसत नसल्याने एकुण चित्र दिसत आहे