आंबेडकरांचा खळबळजनक दावा
नगर : ‘काँग्रेसची सत्ता आली, तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार, असा समज आहे. त्यात काही गैर नाही. मात्र, थोरातांसाठी मला ‘वॉर्निंग बेल’ द्यायची आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार डॉ. सुजय विखे यांनी काही दिवसांपापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. त्यामुळे थोरात यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता बळावली आहे,’ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
आंबेडकर म्हणाले, ‘नगरचे खासदार आणि उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी २८ मे २०२३ रोजी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. याशिवाय खर्गे सोलापूर मार्गे बेंगळुरू येथे जात असताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचीही जुलै २०२३मध्ये त्यांच्याशी भेट झाली.
भाजपमधील नेते काँग्रेसच्या अध्यक्षांना भेटतात ही थोरात यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. हे सगळे होत असताना काँग्रेसचे नेते गाफील राहिले आहेत. भाजपची सत्ता येणार नाही,
हे लक्षात आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अशा पद्धतीने काँग्रेसमध्ये लाइन लावून ठेवण्यास सुरुवात केली आहे.’