शिर्डीचे भूमिपुत्र व सुदर्शन चॅनलचे संस्थापक कट्टर हिंदुत्वादी सुरेश चव्हाणके यांच्या हत्येची सुपारी घेणार्या मौलानाला केले गजाआड
एका उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या नेत्याला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी शुक्रवारी सूरतमध्ये २७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मौलवी अबुबकर टिमोल या नावाने ओळखला जाणारा आरोपी सुदर्शन टेलिव्हिजन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, भाजपाचे तेलंगणाचे आमदार राजा सिंह आणि पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना धमकावण्याच्या कटाचा एक भाग होता, असंही पोलिसांनी सांगितलं.
सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांच्या हत्येचा कट मुस्लिम धर्मगुरूने रचला होता. त्याने राणाला १५ हून अधिक वेळा फोन करून धमकावले होते. २०१९ मध्ये लखनौमध्ये हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या केली त्याप्रमाणे राणांनाही धमकावलं जात होतं.
नेपाळ आणि पाकिस्तानमधील त्यांच्या हस्तकांनी त्याला १ कोटी रुपयांची सुपारी दिली होती, असंही पोलिसांनी सांगितलं.सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान जातीय सलोखा बिघडवण्यासाठी टिमोलला लवकरच राणाला ठार मारायचे होते, असे चॅट रेकॉर्डवरून दिसून आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांची आणखी काही लक्ष्ये आहेत का हे शोधण्यासाठी सुरत पोलीस इतर यंत्रणांची मदत घेत आहेत. सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, भाजपाच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि भाजपाचे तेलंगणाचे आमदार राजा सिंह यांनाही आरोपींनी धमक्या पाठवल्या आहेत.
मूळचा महाराष्ट्रातील नंदुरबारचा रहिवासी असलेल्या या मौलवीला शुक्रवारी सुरतमधील फुलवाडी खाडीजवळील भरीमाता रोडवरून अटक करण्यात आली. सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गहलौत यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले की, “आरोपी एका खाजगी कारखान्यात काम करतो आणि काथोर येथील मुलांना धार्मिक शिक्षण देत असे. काथोर येथील मदरशातूनही त्याने शिक्षण घेतले. आरोपी त्याच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय क्रमांक वापरत होता. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून डोगर (पाकिस्तान) आणि नेपाळमधील शहनाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या हँडलरच्या संपर्कात आला