शिर्डी / राहता तालुक्यातील सावळीविहीर येथील दगडांच्या खाणीत १९ मार्च २०२३रोजी एका स्त्री जातीचे अंदाजे ३०ते३५वयाचा मृतदेह मिळुन आला होता त्याबाबत अकस्मात मृत्यू रजिस्टर ३२/२०२३नुसार गुन्हा देखील तात्कीन तपासी आधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी दाखल केला होता
शिर्डी अग्निशमन दलाच्या जवानांनी संदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून जागेवर पंचनामा देखील करुन मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मोठे प्रयत्न देखील केले होते मात्र ओळख आज अखेर पटलेली नसली तरी शवविच्छेदन लोणी प्रवरा दवाखान्यात करण्यात आले होते अहवाल व न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्याकडे व्हिसेरा डि एन ए नमुना देखील पाठवण्यात आला होता
नुकताच आलेल्या अहवालात योग्य त्या कागदपत्रे तपासणी अहवालात संदर अज्ञात महिलेचा कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे तोड कशाने तरी दाबून गळा आवळून खुन करून प्रेताचा पुरावा नष्ट करण्यासाठी १९मार्च २०२३रोजी दगडांच्या पाणी असलेल्या खाणीत फेकून दिला असावा असे निष्पन्न झाल्याने व आलेल्या अहवालानुसार तब्बल जवळपास १४ महिन्या नतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पपु कांदरी यांनी दिलेल्या शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्यादी नुसार
भादवी २०१,३०२,हे खुनाचे कलम लावण्यात आले असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार हे करीत असून तब्बल १३ महिन्या नतर देखील हि महिला कुठली ती इकडे कशी आली तिला दगडांच्या खाणी जवळ कोण घेऊन गेले तिच्या बरोबर कोण होते खुनाचे कारण काय ओळख पटेल असा कोणताही पुरावा देखील मिळाला नव्हता वरील वर्णन असलेली महिला महाराष्ट्र कोठे मिसिग आहे
का या अँगलने देखील तात्कालिन तपासी आधिकारी प्रविण दातरे यांनी मोठे प्रयत्न केले होते मात्र यश मिळाले नाही आता पुन्हा खुनाच्या अनुषंगाने तपास केला जाईल असे संकेत पुढे आले शिर्डी येथील पानमळा परीसरात देखील महिलेच्या डोक्यात एक वर्षापूर्वी दगड टाकून खुन करण्यात आला होता त्याचा देखील तपास लागलेला नाही या दोन्ही घटना उघडकीस आणण्याचे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या समोर मोठे आव्हान आहे